भरतवाड्यात आज पाणीपुरवठा बंद 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 नोव्हेंबर 2016

नागपूर - महापालिका व ओसीडब्ल्यू जलकुंभ स्वच्छतेच्या चौथ्या टप्प्याला 18 नोव्हेंबरपासून सुरुवात करीत आहे. उद्या भरतवाडा जलकुंभ स्वच्छ करण्यात येणार आहे. त्यामुळे या जलकुंभांतर्गत येणाऱ्या वस्त्यांना उद्या पाणीपुरवठा होणार नाही. 

शहरातील नागरिकांना स्वच्छ पाणीपुरवठा करण्यासाठी गेल्या काही वर्षांत जलकुंभ स्वच्छतेला ओसीडब्ल्यूने प्राधान्य दिले आहे. अत्याधुनिक तांत्रिक यंत्रणेद्वारे यापूर्वी रामनगर, जयताळ्यातील जलकुंभ स्वच्छ करण्यात आले आहे. त्यामुळे पाण्याच्या गुणवत्तेत भर पडली आहे. उद्या, 18 नोव्हेंबर रोजी जलकुंभ स्वच्छतेच्या चौथ्या टप्प्याला प्रारंभ होत असून भरतवाडा जलकुंभाची स्वच्छता करण्यात येणार आहे. त्यामुळे या जलकुंभांतर्गत येणाऱ्या प्रजापतीनगर, नेहरूनगर झोपडपट्टी, त्रिमूर्तीनगर, देशपांडे ले-आउट, हिवरी कोटा, संघर्षनगर, वाठोडा जुनी वस्ती, वर्धमाननगर, पूर्व वर्धमाननगर, पॅंथरनगर, पडोळेनगर, शिवाजी सोसायटी, एलआयजी कॉलनी, एमआयजी कॉलनी, हिवरीनगरमध्ये उद्या सायंकाळी पाणीपुरवठा होणार नसल्याचे ओसीडब्ल्यूने कळविले.

Web Title: Today, the water supply off