आज ठरणार महापौर 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 मार्च 2017

नागपूर - मावळते महापौर प्रवीण दटके यांचा कार्यकाळ पाच मार्च रोजी संपुष्टात येणार असून, त्यांच्या वारसदारांचा शोध आज रात्रीपर्यंतही सुरूच होता. उद्या सकाळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या महाल येथील वाड्यावर नव्या महापौरांच्या निवडीवर खल होणार आहे. त्यानंतर नामांकन अर्ज दाखल केले जाईल. केंद्रीय मंत्री गडकरी हे नंदा जिचकार, चेतना टांक, दिव्या धुरडे, विशाखा मोहोड यापैकी कुणाच्या नावाला हिरवी झेंडी दाखवितात, याकडे आता नागपूरकरांचे लक्ष लागले आहे. 

महापालिका निवडणुकीत भाजपचे 108 सदस्य निवडून आले. आता नागपूरकरांना नव्या महापौरांचे वेध लागले आहेत. महापौरपद अनुभवीकडे देणार की नव्या सदस्यांवर विश्‍वास टाकणार? अशी चर्चा आता रंगली आहे. महापौरपदाच्या शर्यतीत सध्या नंदा जिचकार, चेतना टांक, दिव्या धुरडे या अनुभवी तसेच विशाखा मोहोड या नव्या नगरसेविका आहेत. मात्र, यापेक्षा वेगळा चेहरा देऊन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सर्वांनाच आश्‍चर्याचा धक्का देऊ शकतात, असेही समजते. महापौरांच्या निवडीसाठी उद्या सकाळी महाल येथील नितीन गडकरी यांच्या वाड्यावर निर्णायक बैठक होणार आहे. या बैठकीत शहरातील सर्वच आमदारांसह मनपातील सर्वच मावळते पदाधिकारी तसेच पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहतील. त्यामुळे या बैठकीवर नागपूरकरांच्या नजरा खिळल्या आहे. महापौरांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर महापालिकेत नामांकन दाखल करण्यात येणार आहे. सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत महापौरपदाच्या निवडणुकीसाठी नामांकन दाखल करता येणार आहे. 5 मार्चला महापौर निवडीसाठी सभा होणार आहे. नामांकन अर्जाच्या छाननीनंतर 15 मिनिटे अर्ज मागे घेण्यासाठी संधी देण्यात येईल. 

समतोल साधण्याचा प्रयत्न 
महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष तसेच सत्तापक्ष नेत्यांची निवड करताना शहराच्या चारही भागांचा विचार करण्यात येणार असल्याचे समजते. महापालिकेतील महत्त्वाची पदे पूर्व, पश्‍चिम, उत्तर, दक्षिण या चारही भागात देऊन समतोल साधावा, असा फॉम्युला जवळपास निश्‍चित झाल्याचे सूत्राने सांगितले. 

पक्षांची नोंदणी 
आज 108 सदस्यांच्या नावासह भाजपने विभागीय आयुक्त कार्यालयात गटाची नोंदणी केली. मावळते महापौर प्रवीण दटके, सत्तापक्ष नेते दयाशंकर तिवारी, जलप्रदाय समितीचे अध्यक्ष संदीप जोशी, परिवहन समिती सभापती बाल्या बोरकर यांनी सर्व नगरसेवकांची माहिती, प्रमाणपत्रांसह विभागीय आयुक्त कार्यालयात नोंदणी केली. 

Web Title: Today will be the mayor