डोनेट युवर बुकचा आज सोहळा; डॉ. अभिजित सोनवणे येणार

file photo
file photo

अमरावती ः सकाळ माध्यम समूह व महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या डोनेट युवर बुकचा सोहळा शनिवारी (ता. 6) संत ज्ञानेश्‍वर सांस्कृतिक भवनात सायंकाळी 5 वाजता आयोजित करण्यात आला आहे.
पुण्यात भिक्षेकऱ्यांचे डॉक्‍टर म्हणून प्रसिद्ध असलेले डॉ. अभिजित सोनवणे या कार्यक्रमात अनुभवकथन करणार आहेत. यावेळी महापौर संजय नरवणे, उपमहापौर संध्या टिकले, मनपा आयुक्त संजय निपाणे, न्यू गोल्डन इंग्लिश स्कूलचे संचालक अनिल आसलकर, मनपाचे उपायुक्त नरेंद्र वानखडे, शिक्षणाधिकारी अनिल कोल्हे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत. शालेय साहित्याच्या अभावात एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी "सकाळ'ने चार वर्षांपासून हा उपक्रम राबविला आहे. विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे दान यावेळी करण्यात येईल. समाजाच्या विविध स्तरातून या उपक्रमासाठी मदत गोळा करण्यात आली आहे. मनपाच्या शिक्षण विभागाचे अधीक्षक उमेश गोदे, पोदार इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य सुधीर महाजन यांच्यासह अन्य मंडळीनेसुद्धा या उपक्रमात भरघोस सहकार्य केले आहे.
चार वर्षांपासून भिक्षेकऱ्यांची सेवा
डॉ. अभिजित सोनवणे यांनी पुण्यात गेल्या चार वर्षांपासून भिक्षेकऱ्यांची सेवा केली आहे. दररोज सुमारे शंभर ते 150 रुग्णांना सेवा पुरविली जाते. अकराशे लोकांवर सध्या नियमितपणे उपचार सुरू आहेत. 54 जणांचे पुनर्वसन करण्यात आले असून त्यांनी भिक्षा मागण्याचे सोडून कामधंदा सुरू केला आहे. 70 ते 80 विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्चसुद्धा डॉ. सोनवणे यांनी उचलला आहे. डॉक्‍टरांकडे ज्या पद्धतीने रुग्णाला अपॉइंटमेंट घ्यावी लागते, तसेच डॉ. सोनवणे यांनी प्रत्येक वारी एका देवाला अपॉइंटमेंट दिली आहे. त्या दिवशी ते संबंधित मंदिराच्या समोर असलेल्या भिक्षेकऱ्यांची सेवा करतात. त्यांच्याशी संवाद साधून त्यांचे मतपरिवर्तन, मनपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com