टोल नाक्‍यावर लागणाऱ्या रांगांची समस्या निघेल मार्गी...वाचा

toll tax news
toll tax news

नागपूर : भारतीय महामार्ग प्राधीकरणच्या टोलनाक्‍यांवर एक डिसेंबरपासून फास्टटॅग अनिवार्य केले आहे. अवघे नऊ दिवस शिल्लक असल्याने वाहनचालकांनी फास्टटॅग यंत्रणेसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. शेवटच्या टप्प्यात वाहनचालकांची "धांदल' उडण्याची शक्‍यता आहे. ही बाब लक्षात घेऊन फास्टटॅग स्टिकर नि:शुल्क स्वरूपात उपलब्ध करून देण्याचा विषय एनएचएआयच्या विचाराधीन असून, लवकरच त्यावर शिक्कामोर्तब होणार असल्याची विश्‍वसनीय माहिती आहे.

 
फास्टटॅग इलेक्‍ट्रॉनिक पद्धती आहे. टोल लागणाऱ्या प्रत्येक वाहनाच्या दर्शनी भागात फास्टटॅग स्टिकर लावणे अपरिहार्य आहे. सध्या एनएचएआयचे नाके आणि बॅंकांच्या शाखांमधून त्याची विक्री सुरू आहे. पूर्वी दोनशे रुपयांना मिळणारे स्टिकर सध्या शंभर रुपयांमध्ये मिळू लागले आहे. फास्टटॅग स्टिकर मिळविण्यासाठी वाहनचालकांनी हालचाली सुरू केल्या असल्या तरी अद्याप अपेक्षित प्रतिसाद मिळू शकला नाही. यंत्रणा यशस्वी व्हावी यादृष्टीने सर्वांचेच प्रयत्न सुरू आहेत.

वाहनचालकांना आकर्षित करण्यासाठी फास्टटॅग स्टिकर नि:शुल्क उपलब्ध करून देण्यासंदर्भात एनएचएआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये खल सुरू आहे. लवकरच यासंदर्भातील निर्णय होऊन स्टिकर नि:शुल्क केले जाऊ शकतील. स्टिकर नि:शुल्क असले तरी ते कार्यान्वित करण्यासाठी पुढील प्रक्रिया पूर्ण करून खात्यात रकमेचा टॉपअप करून घ्यावाच लागणार आहे.

स्टिकर नि:शुल्क उपलब्ध करून देण्यासंदर्भात वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असल्याच्या वृत्ताला वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही दुजोरा दिला. अगदी आज-उद्यामध्येच या निर्णयावर शिक्कामोर्तब होऊ शकेल, असा विश्‍वासही अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. 
स्टिकरवरील माहिती बॅंक खात्याशी लिंक असेल. यामुळे वाहन टोलनाक्‍याजवळ येताच.

वैशिष्ट्यपूर्ण कॅमेरे वाहनावरील स्टिकर स्कॅन करून बॅंक खात्यातून आपोआपच टोलची रक्कम कापून घेईल आणि समोरचे बॅरीगेट वाहनासाठी मोकळे होईल. ही प्रक्रिया गतीने पूर्ण होणार असल्याने टोल नाक्‍यावर लागणाऱ्या रांगांची समस्या मार्गी लागेल, शिवाय नाक्‍यांवरील गैरप्रकारालासुद्धा आळा बसू शकेल. 


प्रतिसाद वाढतोय, पण अपेक्षेनुरूप नाही

टोल लागणाऱ्या प्रत्येक वाहनाला फास्टटॅग अनिवार्य आहे. लाखोंच्या संख्येने वाहने असलीत तरी अद्याप अपेक्षित प्रतिसाद नाही. टोल नाक्‍यांवरून दररोज 50 ते शंभरच फास्टटॅग स्टिकरची विक्री सुरू आहे. प्रतिसाद वाढल्यास पेट्रोल पंपांवरूनही ते उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने विचार सुरू आहे. 
 


दुसऱ्याला गाडी देणे पडेल महागात

 "फास्टटॅग' लावल्यानंतर मित्र किंवा दुसऱ्याला गाडी देणे गाडी मालकाला चांगलेत महागात पडू शकतो. कारण टोल नाक्‍याचे शुल्क गाडीमालकाच्या बॅंक खात्यातून परस्पर कापले जाणार आहे. त्यामुळे यापुढे दुसऱ्याला फिरण्यासाठी गाडी देताना चारवेळा विचार करा. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com