युतीचा विषय शिवसेनेसाठी केव्हाच संपला - उद्धव ठाकरे 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 मे 2018

नागपूर - शिवसेना-भाजपची युती होणार की नाही? असा प्रश्‍न संबंध महाराष्ट्राला पडला असताना शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युतीचा विषय आमच्यासाठी केव्हाच संपला असे सांगून युतीच्या चर्चेला पूर्णविराम दिला. शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला असल्याने आता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या बोलण्याला काही अर्थ नाही, असेही त्यांनी अप्रत्यक्षपणे सूचित केले. 

स्वबळावर निवडणुकीची चाचपणी करण्यासाठी उद्धव ठाकरे आज नागपूरला आले होते. विदर्भातील लोकसभानिहाय पदाधिकाऱ्यांच्या त्यांनी बैठका घेतल्या. त्यानंतर रविभवन येथे पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. या वेळी अमित शहा यांनी युतीसंदर्भात केलेल्या वक्तव्याकडे लक्ष वेधले असता त्यांची माझी त्यांच्याशी चर्चा झाली नाही, असे एका वाक्‍यात उत्तर दिले. 

शिवसेना विदर्भविरोधी नाही 
""महाराष्ट्र एकसंध राहावा ही शिवसेनेची आधीपासून भूमिका आहे. ती आजही कायम आहे. याचा अर्थ शिवसेना विदर्भविरोधी आहे असा नाही. मुख्यमंत्री विदर्भाचे आहेत. सर्व प्रमुख खाती विदर्भाकडे आहेत. त्यांनी विदर्भाचा विकास करावा. विकासाचा अनुशेष भरून काढावा. नागपूरमध्ये पावसाळी अधिवेशन घेण्यासही विरोध नाही. मात्र, हिवाळी अधिवेशनाप्रमाणेच थातूरमातूर, खोट्या घोषणा केल्या जाणार असेल तर त्याचा काय फायदा?'' असा सवालही ठाकरे यांनी उपस्थित केला. 

सर्वेक्षणावर विश्‍वास नाही 
शिवसेना, भाजप स्वतंत्रपणे लढण्यास काय चित्र राहील यावर झालेल्या शिवसेनेचे किती उमेदवार निवडून येतील याबाबत एक सर्वेक्षण झाला आहे. या प्रश्‍नावर उद्धव ठाकरे यांनी शिवसेना सर्वेक्षण करीत नाही. शिवसेनेचा सर्वेक्षणावर नव्हे, तर मेहनतीवर विश्‍वास असल्याचे सांगितले. 

ईव्हीएम लोकशाहीचा अपमान 
जनतेच्या मनाविरुद्ध निकाल लागत असल्याने ईव्हीएमविषयी संभ्रम आहे. आपण टाकलेले मत त्याच उमेदवाराला मिळाले की नाही हे कळण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. तो प्रत्येकाचा मूलभूत अधिकार आहे. तसे होत नसेल तर हा लोकशाहीचा अपमान असल्याचे सांगून उद्धव ठाकरे यांनी ईव्हीएमला विरोध केला. 

Web Title: topic of the alliance ended says Uddhav Thackeray