पर्यावरण शिक्षण विषयाचा तिढा कायम

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 ऑगस्ट 2019

भद्रावती(चंद्रपूर ) : राज्यातील खासगी मान्यताप्राप्त अनुदानित उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयीन पर्यावरण शिक्षण या विषयाच्या शिक्षकांच्या वाढीव पदांना मान्यता आणि त्यांच्या वेतनाचा प्रश्न मागील एक दशकापासून ऐरणीवर आहे.

भद्रावती(चंद्रपूर ) : राज्यातील खासगी मान्यताप्राप्त अनुदानित उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयीन पर्यावरण शिक्षण या विषयाच्या शिक्षकांच्या वाढीव पदांना मान्यता आणि त्यांच्या वेतनाचा प्रश्न मागील एक दशकापासून ऐरणीवर आहे.
या पदांसाठी आवश्‍यक कार्यभार, बिंदूनामावली व संचमान्यता असताना देखिल राज्याप्रमाणेच चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयातील पर्यावरण शिक्षण या विषयाच्या अर्धवेळ पदांना अद्याप पुर्णकालीन पदमान्यता देण्यात आलेली नाही. सन 2010-11 पासून जिल्ह्यातील उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयांनी शिक्षण उपसंचालक, नागपूर विभागाकडे अर्धवेळ पदाचे पुर्णकालीन पदमान्यता प्रस्ताव पाठविलेले आहेत. शिक्षण उप-संचालक, नागपूर विभागाने शिक्षण संचालक, पुणे येथे सदर प्रस्ताव मान्यतेसाठी अग्रेषित केले आहे. मात्र पुणे विभागाकडून मुंबई शिक्षण मंत्रालय व वित्त विभागाकडे मागील अनेक वर्षांपासून प्रस्ताव पाठविले नाहीत. परिणामी अनुदानित पूर्ण कार्यभार असूनही अनेक पर्यावरण शिक्षण विषयाच्या उच्च माध्यमिक शिक्षकांना पूर्णवेळ काम मात्र अर्धपगारी करावे लागत आहे. यांच्या "बॅकवेजे'स चा प्रश्न देखील अधांतरी आहे. सारख्या कार्यभारावर असलेल्या एका शिक्षकाला पूर्ण पगार तर दूत-याला अर्धा पगार. यामुळे अशा शिक्षकांवर दुजाभाव व अन्याय होत आहे.

विषयाचे नामकरण
सर्वोच्य न्यायालयाच्या आदेशाने सन 2005 नंतर सुरु झालेल्या पर्यावरण शिक्षण या विषयाची जिल्ह्यातील अनेक पदे पूर्ण कार्यभार असतानाही अर्धवेळ आहेत. आता यावर्षीपासून या विषयाची व्याप्ती वाढवून "पर्यावरण शिक्षण आणि जलसुरक्षा' असे या विषयाचे नामकरण केले आहे. सध्याच्या बदलत्या जागतिक पार्श्‍वभूमीवर हा विषय अत्यंत महत्वाचा आहे. 2014 मधे राज्य शासनाने विविध विषयांच्या 709 पदांना पूर्णवेळ पदमान्यता दिलेली आहे. परंतु या पदमान्यतेत प्रस्तावातील अनेक उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयातील पर्यावरण शिक्षण विषयाची अर्धवेळ पदे सुटलेली आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The topic of environmental education remains constant