'टिकटॉक' करीता पुरात जीवघेणी स्टंटबाजी? (व्हिडिओ)

पंजाबराव ठाकरे
शनिवार, 10 ऑगस्ट 2019

पुराच्या पाण्यात स्टंट करणे जिवाशी खेळणे नाही का ? असा सवाल शुक्रवारी खिरोडा येथील एका तरुणांच्या कृत्यावरून निर्माण होत आहे.

संग्रामपूर (बुलढाणा) : पुराच्या पाण्यात स्टंट करणे जिवाशी खेळणे नाही का ? असा सवाल शुक्रवारी खिरोडा येथील एका तरुणांच्या कृत्यावरून निर्माण होत आहे.

दरम्यान, शुक्रवारी पुर्णा नदीला मोठा पूर आलेला असताना, या नदीवर नवीन बांधकाम होत असलेल्या जवळपास दोनशे फूट उंचीच्या पुलावरून एका हौशी तरुणाने उडी मारली. ती कशासाठी तर टिकटॉक व्हिडीओ बनविण्यासाठी हा युवक स्टंट करत असल्याचे समजते.

अर्थात सदर तरुणाला पोहता येत असेलच म्हणूनच तो काही अंतरावर पोहत जाऊन काठाला लागला. पण असा स्टंट तुमच्या जीवाला धाेका ठरु शकतो. याचे भान सध्याच्या राज्यातील पूरस्थितीवरून येणे आवश्यक ठरते. या पुलावर अश्या स्टंटबाजीला आळा घालण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनचे अथवा संबंधित शासकीय यंत्रणेचे जबाबदार कुणीही राहत नसल्याने असे प्रकार होत आहेत.

दरम्यान, पोहणार्या तरुणाचे दृश्य पाहण्यासाठी या ठिकाणी गर्दीही जमली होती. टिकटॉकसाठी स्टंट करने अनेकांच्या जीवावर बेतले आहे, तरिही असे प्रकार सुरू आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Totally life-threatening stunt for 'Tik Tok'?