बगाजी सागर धरणावर पर्यटकांची गर्दी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 सप्टेंबर 2019

धामणगाव रेल्वे (जि. अमरावती) : तालुक्‍यातील वरुड बगाजी गावानजीकच्या निम्न वर्धा प्रकल्प बगाजी सागर धरणाचे दरवाजे 17 सप्टेंबरला 3 सेंटीमीटरने उघडण्यात आले होते. आता पुन्हा या धरणाचे दरवाजे 25 सेंटीमीटरने उघडण्यात आले असून पाण्याचा विसर्ग पाहण्यासाठी धरण परिसरात पर्यटकांची गर्दी होत आहे.

धरणाच्या 11 दरवाज्यांमधून 262 घन मीटर पाण्याचा विसर्ग केला जात आहे. रात्रीच्या वेळी या धरणावर रोशनाई करण्यात आल्याने धरणाच्या सौदर्यात भर पडत आहे. या धरणाची पाणी साठवण क्षमता 283.80 दलघमी आहे. धरणक्षेत्रातील वरच्या भागात पाणी आले अथवा पाऊस झाला की, धरणाच्या जलसाठ्यात प्रचंड वाढ होते. निम्न वर्धा धरणात 24 सप्टेंबरला धरण पातळी 283.800 मी. (100टक्के) असून धरण सुरक्षेच्या दृष्टीने निम्न वर्धा धरणातून वर्धा नदीपात्रात विसर्ग करण्यात येत आहे.
यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून कोणीही नदीपात्रात जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: tourist crowd on bagachi sagar dam