आता पर्यटकही म्हणताहेत, "मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन' 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 डिसेंबर 2019

नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात कोका अभयारण्याचा समावेश आहे. वाघ, बिबट, अस्वल, हरीण, नीलगाय या वन्यप्राण्यांसह सुमारे 200 प्रकारचे पक्षी, 50 प्रकारची फुलपाखरे व एक हजार प्रकारच्या वनस्पती आहेत.

भंडारा : नुकत्याच पार पडलेला विधानसभा निवडणुकीच्या प्रचार एका अर्थाने चांगलाच गाजला. तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी प्रचारादरम्यान महराष्ट्राच्या जनतेला "मी पुन्हा येईन' असे आश्‍वासन दिले होते. त्यानंतर हे वाक्‍य चांगलेच लोकप्रिय झाले आहेत. आता हेच बघा ना, एका उत्साही पर्यटकाने देखील नोंदवहीत "मी पुन्हा येईल' अशी नोंद केली. बघता बघता त्या पर्यटकाचा अभिप्राय आत व्हायरल झाला आहे. 

वाघांसाठी प्रसिद्ध नवेगाव नागझिरा प्रकल्प 
नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात कोका अभयारण्याचा समावेश आहे. वाघ, बिबट, अस्वल, हरीण, नीलगाय या वन्यप्राण्यांसह सुमारे 200 प्रकारचे पक्षी, 50 प्रकारची फुलपाखरे व एक हजार प्रकारच्या वनस्पती आहेत. याशिवाय राजडोह तलावात बाराही महिने पाणी राहत असल्याने वन्यप्राण्यांचे हमखास दर्शन होते. विशेषत: वाघांसाठी हा अभयारण्य ओळखता जातो. वाघ पाहण्यासाठी येथे दररोज पर्यटकांची गर्दी होत असते.

 

No photo description available.

 

अभिप्राय पुस्तिेकेत नोंद
नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात काही पर्यटक कोका अभयारण्याच्या भ्रमंतीवर आले होते. जंगलाची सैर झाल्यानंतर पर्यटकांना अभयारण्य कसा वाटला, काही सूचना असल्यास त्या नमूद करण्यासाठी फिडबॅक फॉर्म भरून मागितला जातो.
 

कसं काय बुवा? - "गोबरगॅस'च्या टाकाऊ पदार्थापासून दगडी कोळसा (व्हिडिओ)

त्यातील दीपक नामक पर्यटकाने फिडबॅक फॉर्ममध्ये असलेल्या निसर्ग मार्गदर्शकाचे वन्यजीव, जंगलाचे ज्ञान, निसर्ग मार्गदर्शक जंगलाच्या नियमांबाबत जागरुकता, निसर्ग मार्गदर्शक सफारीदरम्यान व्यसन केले होते काय, निसर्ग मार्गदर्शकाचा स्वभाव, वागणूक कशी वाटली याबाबत अभिप्राय नमूद केला. त्यानंतर त्याने अभयारण्यात आलेले अनुभव व सूचनेच्या रकान्यात "मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन' असे तीनदा लिहून अभयारण्य व वन्यप्राण्यांबद्दलचे प्रेम व्यक्त केले. 

या अभिप्रायावरून त्यांना हा अभयारण्य चांगलाच आवडला. ते पुन्हा अभयारण्याला भेट देतील, यात शंका नाही. परंतु, या पर्यटकांच्या प्रेमाला अलीकडच्या राजकीय घडमोडींची झालर होती. त्यामुळे सदर पर्यटकाच्या फिडबॅक फॉर्मची चर्चा संपूर्ण वन्यजीव विभागात सुरू आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: tourist feedback got viral in bhandara