रस्त्यावरील खड्ड्यांनी घेतला भावंडांचा बळी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 जुलै 2018

विरुर (स्टे.)(चंद्रपूर), ता. 15 ः बाम्हणी-आसिफाबादकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे डांबरीकरण उखडले असून, जागोजगी खड्डे पडले आहेत. खड्ड्यांच्या दुरुस्तीची मागणी करून त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. शनिवारी (ता. 14) खड्डे चुकवून वाहन नेत असताना मागून येणाऱ्या ट्रकने दुचाकीला धडक दिली. यात दोन भावंडांचा मृत्यू झाला. प्रमोद अमृत मालखेडे (वय 32) आणि विनोद अमृत मालखेडे (वय 34) अशी मृतांची नावे आहे.

राजुरा तालुक्‍यातील वरुर रोड येथील प्रमोद आणि विनोद मालखेडे राहणारे. काही कामानिमित्ताने दोघेही शनिवारी (ता. 14) सकाळी एमएच 34 ए. एन. 9374 या क्रमांकाच्या दुचाकीने राजुरा येथे गेले. काम आटोपून दोघेही भाऊ दुचाकीने वरुर रोडकडे येण्यास निघाले. ब्राम्हणी-आसिफाबाद मार्गावरच त्यांचे गाव आहे. त्यामुळे याच मार्गाने ते निघाले. या मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे खड्डे चुकवून ते वाहन नेत होते. तुलाना गावाजवळ खड्डा चुकविण्याचा प्रयत्नात मागून येणाऱ्या अज्ञात ट्रकने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. यात प्रमोग मालखेडे याचा जागीच मृत्यू झाला, तर विनोद हा गंभीर जखमी झाला. त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा रात्रीच मृत्यू झाला. याआधीही येथे अपघाताच्या घटना घडल्या. त्यात काहींचे बळी गेले. मात्र, अजूनही सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेतले नाही. त्यामुळे नागरिकांत संतापाचे वातावरण पसरले आहे.
चंद्रपुरातही खड्ड्यांचे बळी
चंद्रपूर शहरातही ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. मागील आठवड्यात एका शिक्षिकेचा मृत्यू झाला. त्यानंतर एका विद्यार्थिनीचा खड्डे चुकविताना मागाहून ट्रकने दिलेल्या धडकेत मृत्यू झाला.

Web Title: tow brothers death in road accident