दोन टक्‍क्‍यांमुळे व्यापारी त्रस्त

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 डिसेंबर 2016

बॅंकेचा सर्व्हिस चार्ज भरायचा कोणी?- चिल्लर किराणा व्यापाऱ्यांचा सवाल

नागपूर - पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनानुसार चिल्लर किराणा व्यापाऱ्यांना पॉज मशीन दुकानात लावल्या आहेत. मात्र, यातून होणाऱ्या व्यवहारावर बॅंका दोन टक्के सर्व्हिस चार्ज आकारतात. तो ग्राहकांकडून घेतल्यास ग्राहक संघटना नोटीस पाठवितात. यामुळे दोन टक्‍क्‍यांचे नुकसान कोण सोसणार, असा सवाल नागपूर चिल्लर किराणा व्यापारी संघाने केला आहे. 

भ्रष्टाचार रोखण्यासाठी केंद्र शासनामार्फत डिजिटल व्यवहारावर भर दिला जात आहे. यामुळे काळा पैसा निर्माण होणार नाही, ग्राहकांना अवाजवी किंमत मोजावी लागणार नाही, असाही दावा केला जात आहे. सोबतच दुकानदारांना रोख बाळगण्याची गरज नसून सर्व पैसा सुरक्षित राहील, असेही सांगण्यात येते. मात्र, डिजिटल व्यवहार करताना दोन टक्के भुर्दंड व्यापाऱ्यांना सोसावा लागत आहे. नागपूर चिल्लर किराणा व्यापारी संघाचे सचिव ज्ञानेश्‍वर रक्षक यांनी आपल्या दुकानात पॉज मशीन लावले. बॅंका सर्व्हिस चार्ज म्हणून सुमारे दोन टक्के रक्कम कापून घेते. ग्राहकांना दोन टक्के सर्व्हिस चार्ज मागितला, तर ते नकार देतात. काही ग्राहकांकडून तो आकारल्यावर ग्राहक संघटनांनी ग्राहकांची लुबाडणूक करीत असल्याची नोटीस त्यांना पाठविली. किराणा व्यवसाय अत्यंत कमी नफ्यावर केला जातो. त्यात दोन टक्के कापल्या जात असल्याने नुकसान होत आहे. 

कॅशलेश व्यवहार करणार कसे?
राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावर राज्य शासनाची भूमिका स्पष्ट करावी. अल्पश: नफ्यातून बॅंकांना सर्व्हिस चार्ज द्यावा लागत असेल, तर लहान व्यापारी कॅशलेस व्यवहार करणार नाहीत, असेही ज्ञानेश्‍वर रक्षक यांनी कळविले आहे.

Web Title: traders suffer by two percentage