वाहतुकीची तक्रार  सोशल मीडियावर 

अनिल कांबळे
सोमवार, 11 जून 2018

नागपूर - वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी पोलिसांनी नवा प्रयोग सुरू केला. यामुळे आता शहरातील वाहतूक व्यवस्थेची तक्रार थेट सोशल मीडियाच्या माध्यमातून करता येईल. त्याची दखल वाहतूक पोलिस उपायुक्तांकडून तत्काळ घेतली जात आहे. आतापर्यंत गेल्या पाच महिन्यांत अडीच हजार तक्रारींचे समाधान वाहतूक पोलिसांनी केले. 

नव्या प्रयोगामुळे शहरातील वाहतुकीबाबत कोणतीही तक्रार व्हॉट्‌सॲप, ट्विटर, फेसबुक आणि मॅसेजच्या माध्यमातून करण्याचे आवाहन वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्‍त एस. चैतन्य यांनी ‘सकाळ’शी बोलताना केले. हा राज्यातील पहिलाच प्रयोग असल्याचेही त्यांनी नमूद केले. या तक्रारींची पोलिस उपायुक्‍त एस. चैतन्य स्वतः दखल घेणार आहेत. त्यासाठी ‘ई-सेल’ या विशेष विभागाची स्थापना केली. तक्रारींवर कार्यवाही करण्यासाठी एक पथक तैनात असते. शहरात कुठेही ट्रॅफिक जॅम, तसेच कुणी वाहतूक नियमांचे उल्लंघन करीत असल्यास वाहतूक पोलिसांच्या ‘ट्रॅफिक पोलिस नागपूर’ या वेबसाइट, व्हॉट्‌सॲप क्रमांक (९०११३८७१००), नागपूर पोलिस फेसबुकवरूनही तक्रार करण्याचे आवाहन पोलिस उपायुक्‍त एस. चैतन्य यांनी केले.

शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी नागरिकांचे सहकार्य महत्त्वाचे आहे. कुणी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करीत असेल तर जबाबदार नागरिक म्हणून पोलिसांना कळवा. त्यासाठी सोशल मीडियाचा पर्याय सामान्य नागरिकांकडे आहे. नागरिकांनी केलेली प्रत्येक तक्रार गांभीर्याने घेऊन सोडविण्यात येईल.
- डॉ. के. वेंकटेशम्‌  (पोलिस आयुक्‍त, नागपूर)

Web Title: Traffic Complaint on social media