विवाह सभागृहांमुळे होते "ट्रॅफिक जाम' 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 जानेवारी 2017

नागपूर - विवाह सभागृह, मोठे क्‍लब यांच्यामुळे शहरात विविध ठिकाणी "ट्रॅफिक जाम' होत असल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने चिंता व्यक्त केली. तसेच या प्रकारच्या सभागृहांतील कार्यक्रमांसाठी परवानगी देताना वाहनांच्या पार्किंगचा मुद्दा लक्षात घेण्यात येतो की नाही, याबाबतचे स्पष्टीकरण पोलिस आयुक्तांना मागितले आहे. 

शहरातील बहुतांश सभागृहांमध्ये वाहन ठेवण्यासाठी पुरेशी जागा नसल्याचा मुद्दा सुनावणीदरम्यान उपस्थित करण्यात आला. वाहन ठेवण्यासाठी जागा नसल्यामुळे रस्त्यांवर वाहने ठेवण्यात येतात. रस्त्याच्या दुतर्फा वाहनांचे पार्किंग करण्यात येत असल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. सभागृहांप्रमाणेच डॉक्‍टरदेखील त्यांच्या इस्पितळातील पार्किंगच्या जागेचा गैरवापर करतात. यामुळे धंतोली, रामदासपेठ, धरमपेठ आदी भागांमध्ये वाहतुकीची समस्या निर्माण होत असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. यावरदेखील न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. या वेळी न्यायालयाने सीपी क्‍लबमुळे वाहतुकीची कोंडी होत असून याचा फटका न्यायाधीशांनादेखील बसल्याचे म्हटले. 

यासंदर्भात सरकारने पोलिस आयुक्तांकडून स्पष्टीकरण मागण्याचे आदेश न्यायालयाने दिले. सरकारतर्फे मुख्य सरकारी वकील भारती डांगरे, महापालिकेतर्फे ऍड. सुधीर पुराणिक यांनी बाजू मांडली. या प्रकरणी न्यायालय मित्र म्हणून ऍड. श्रीरंग भांडारकर कामकाज पाहत आहे. 

अशी आहे मूळ याचिका 
शहरातील शाळा, महाविद्यालये व क्‍लासेस या सकाळी ठिकाणी फेरफटका मारला असता युवकांबरोबरच अल्पवयीन मुलेही विविध कंपन्यांच्या हायस्पीड बाईक धूमस्टाइलने कसरती करतात. बरेचदा एका बाइकवर तिघे-चौघेजण बसून वेगाने फिरत असताना दिसतात. विशेष म्हणजे, चालक परवाना नसताना गाडी चालविण्याचे प्रकार वाढले आहेत. यामुळे वाढलेले अपघात लक्षात घेत न्यायालयाने स्वत:हून जनहित याचिका दाखल करून घेतली आहे.

Web Title: traffic jam