नागपुरातील वाहतूक पुन्हा बेशिस्त 

traffic news in nagpur city
traffic news in nagpur city

नागपूर : शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पोलिस आयुक्‍त आणि उपायुक्‍त (वाहतूक) यांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. मात्र, शहरातील वाहतूक सुधारण्याचे नाव घेत नाही. चारचाकी आणि दुचाकी वाहनांचे रस्त्यावर पार्किंग सुरू असल्याने अनेक ठिकाणी ट्रॅफिक जॅम लागतो. यावर तोडगा काढण्यात वाहतूक पोलिसांना अपयश येत आहे.
 
शहर वाहतूक पोलिस दलात अपुरे मनुष्यबळ आणि पोलिस वाहनांची कमतरता असल्याने पोलिस कारवाई करण्यात मागे पडत आहेत. नागरिकसुद्धा गर्दीच्या ठिकाणी रस्त्यावरच दुचाकी पार्किंग करून ठेवतात. तसेच बाजार, मार्केट्‌स किंवा मॉल परिसरात तर दुचाकींची एवढी गर्दी असते की, रस्त्यावर चारचाकी वाहने चालविणेसुद्धा कठीण होते. वाहतूक पोलिस या प्रकाराकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे रस्त्यावर ट्रॅफिक जॅम लागतो. केवळ पोलिस नियंत्रण कक्षाला माहिती दिल्यानंतरच एखादा वाहतूक पोलिस कर्मचारी वाहतुकीची कोंडी फोडण्यास येतो. 

वाहतुकीची कोंडी निर्माण होऊ नये म्हणून पोलिस पूर्वतयारी करीत नाहीत. तसेच वाहनचालकांवर पोलिसांचा वचक नसल्याने कुणीही वाहनचालक कुठेही बिनधास्त वाहन पार्क करतो. नो पार्किंगमध्ये ठेवलेली वाहने उचलण्यासाठी पोलिसांकडे पुरेशी वाहने नाहीत. त्यामुळे अनेक वाहनचालक गजबजलेल्या ठिकाणी अगदी रस्त्यावर वाहन पार्क करून निघून जातात. तर, एक वाहन आरटीओ टॅक्‍स न भरल्याने जप्त केल्याची माहिती आहे. 
 


पिकअप व्हॅन ऍण्ड टोइंग वाहन 

शहर पोलिस दलात वाहतूक विभागाने दहा चेंबर तयार केले आहेत. मात्र, त्यापैकी केवळ चारकडे पिकअप व्हॅन आहेत. यात सीताबर्डी, सदर, अजनी आणि कॉटन मार्केट या चेंबरचा समावेश आहे. अन्य चेंबरमध्ये एमआयडीसी, सक्‍करदरा, इंदोरा, कामठी यांच्याकडे पिकअप व्हॅन नाही. त्यामुळे या परिसरात रस्त्यावर दुचाकी ठेवण्याचे प्रमाण वाढले आहे. पोलिसांकडे दुचाकी उचलण्यासाठी वाहने नाही, तर भीती कशाला; अशी स्थिती निर्माण झाली आहे. 
 

जॅमर वाहनांची चांदी 

रस्त्यावर ट्रॅफिक जॅम होऊ नये म्हणून वाहतूक चेंबरचे कर्मचाऱ्यांकडे टोइंग व्हॅन आणि जॅमवर व्हॅन आहे. मात्र, या वाहनांवरील पोलिस कर्मचारी वाहनांना जॅमर लावल्यानंतर दंडात्मक कारवाई करण्याऐवजी "सेटिंग' करून वसुली करतात, अशी चर्चा आहे. जॅमर वाहनांवर असलेले खासगी युवक लगेच पैशाची बोलणी करून पैसे वसुली करून कर्मचाऱ्यांना देतात व त्या कमाइमध्ये "साहेबांचाही' वाटा असतो, अशी चर्चा आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com