साडेचार हजार वाहनचालकांवर कारवाई 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

नागपूर - स्वातंत्र्यदिनाचा आनंद साजरा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात युवावर्ग रस्त्यावर उतरला होता. अनेकांनी वाहने सुसाट चालवून वाहतुकीच्या नियमांची ऐशीतैशी केली. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी आक्रमकता दाखवत एकाच दिवसांत तब्बल 4 हजार 546 वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करीत "रेकॉर्ड' केला. चेम्बर दोनच्या पोलिसांनी सर्वाधिक कारवाई केली. 

बुधवारी सकाळपासूनच तरुणाई रस्त्यावर आनंद साजरा करीत होती. दुपारी बाराच्या सुमारास फुटाळा, अंबाझरी आणि सेमिनरी हिल्स परिसरात अनेक वाहनचालक सुसाट वाहन चालवीत होते. तसेच शहरातही वाहतूक नियमांचे उल्लंघन करीत होते. यासोबतच युवकांपेक्षा जास्त युवती ट्रीपल सीट वाहन चालवीत वाहतुकीचे नियम मोडत होत्या. वाहतूक पोलिसांवर शिरजोर होऊन तरुणाई सुसाट असल्यामुळे पोलिसांनी चौकाचौकांत बॅरिकेड्‌स लावून चालान कारवाईचा धडाका सुरू केला. अनेक वाहनचालकांनी पोलिसांना चकमा दिला, तर काहींना दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागले. 

हुल्लडबाजांनी काढल्या उठाबशा 
सुसाट दुचाकी चालविणे तसेच कारच्या टपावर बसून हुल्लडबाजी करणाऱ्या वाहनचालकांना वाहतूक पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तसेच आरडाओरड करून नागरिकांना त्रास देणाऱ्या वाहनचालकांना वाहतूक पोलिसांनी पकडले. त्यांना भररस्त्यात यानंतर वाहतूक नियम मोडणार नाही, असे वचन घेतले. त्यानंतर त्यांना 50 उठाबशा काढण्याची शिक्षा दिली. पोलिस निरीक्षक अतुल सबनीस यांनी वाहनचालक अल्पवयीन मुलांना पकडून त्यांच्या पालकांना स्वाधीन केले. तसेच वाहतूक नियमांचे पालन करणाऱ्यांना त्यांनी गुलाबाचे फूल देऊन स्वागतही केले. 

ट्रीपल सीट - 255 
हेल्मेट - 268 
रॉंग साइड - 54 
ड्रंक अँड ड्राइव्ह - 49 
वाहन जप्त - 116 
ई-चालान - 2,121 
हार्डचालान - 1,710

Web Title: Traffic police action on the Four and a half thousand motorists