तप्त उन्हातही वाहतूक पोलिस राहणार कूल कूल! 

अनिल कांबळे
रविवार, 15 एप्रिल 2018

व्हर्चुअल क्‍लासरूम या नावीन्यपूर्ण प्रकल्पाच्या उद्‌घाटन कार्यक्रमाला 12 पोलिस प्रशिक्षण केंद्रांमधील विविध क्‍लासरूममधील पोलिस दलातील अधिकारी आणि प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. अपर मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव यांनी मार्गदर्शन केले. व्हर्च्युअल क्‍लासरूमद्वारे नाशिक पोलिस ऍकेडमी व राज्यातील 11 पोलिस प्रशिक्षण केंद्रांना एकत्रित जोडता येते.

नागपूर : रणरणत्या उन्हात वाहतूक नियमन करणाऱ्या पोलिसांना कूल वेस्ट जॅकेट उपलब्ध करून देण्यात आले आहे. बाहेरील तापमानापेक्षा 6 अंशांपर्यंत कमी तापमान राखण्यास मदत करणाऱ्या या जॅकेटमुळे तप्त उन्हातही पोलिसदादा कूल कूल राहतील. 

शहर पोलिस आयुक्तालयांतर्गत उभारण्यात आलेल्या व्हर्च्युअल क्‍लासरूमचे शुक्रवारी पोलिस महासंचालक सतीश माथूर यांच्या हस्ते उद्‌घाटन करण्यात आले. या सोहळ्याला अप्पर पोलिस महासंचालक जगन्नाथन, पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, सहपोलिस आयुक्त शिवाजी बोडखे, एएनओचे पोलिस महानिरीक्षक शरद शेलार प्रामुख्याने उपस्थित होते. याच सोहळ्यादरम्यान वाहतूक पोलिसांना मान्यवरांच्या हस्ते कूल वेस्ट जॅकेटचे वितरण करण्यात आले. शहर पोलिस आयुक्तालयांतर्गत असलेल्या मानवी संसाधन विभागामार्फत हे जॅकेट उपलब्ध करून देण्यात आले आहे. या जॅकेटचे वैशिष्ट्य म्हणजे ते बाहेरील तापमानापेक्षा 6 अंश तापमान कमी राखते. 1 ते 2 मिनिटांतच कार्यान्वित होणारे हे जॅकेट वजनाला हलके असून हाताळण्यास सुलभ आहे. 

व्हर्चुअल क्‍लासरूम या नावीन्यपूर्ण प्रकल्पाच्या उद्‌घाटन कार्यक्रमाला 12 पोलिस प्रशिक्षण केंद्रांमधील विविध क्‍लासरूममधील पोलिस दलातील अधिकारी आणि प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. अपर मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव यांनी मार्गदर्शन केले. व्हर्च्युअल क्‍लासरूमद्वारे नाशिक पोलिस ऍकेडमी व राज्यातील 11 पोलिस प्रशिक्षण केंद्रांना एकत्रित जोडता येते. मुंबई, नागपूर व नाशिक येथील अद्ययावत व आधुनिक व्हर्चुअल स्टुडिओमधून राज्यातील सर्व प्रशिक्षण केंद्रांतील 225 वर्गातील 9000 हून अधिक प्रशिक्षणार्थ्यांना एकाचवेळी नामवंत व्याख्यात्यांद्वारे प्रशिक्षण देता येणे शक्‍य आहे. या प्रोजेक्‍टमध्ये व्हिडिओ लायब्ररीची सुविधा असल्याने व्याख्यात्यांचे व्याख्यान पुनः प्रक्षेपण करून निरंतर प्रशिक्षण प्रदान करता येते. पोलिस दलामध्ये व्हर्चुअल क्‍लासरूममध्ये प्रोजेक्‍ट राबविणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरणार आहे. 
याच कार्यक्रमाच्या निमित्ताने एन कॉप्स या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा वर्षपूर्ती सोहळासुद्धा पार पडला. एन कॉप्स सेंटरमध्ये महत्त्वपूर्ण योगदानासाठी माथूर यांच्या हस्ते पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील, सुहास बावचे, श्‍वेता खेडकर, महिला पोलिस उपनिरीक्षक कल्पना धवने व त्यांच्या सहकाऱ्यांचा गौरव करण्यात आला.

Web Title: traffic police jacket Nagpur