...तर स्कूलबसमधील 14 विद्यार्थ्यांचा जीव आला असता धोक्‍यात 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 डिसेंबर 2019

शुक्रवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास एक भरधाव स्कूल व्हॅन (एमएच 49-एटी 3337) क्रीडा चौकाकडून विमा दवाखान्याकडे जात होती. व्हॅनमध्ये शिकवणीला जात असलेली 14 मुले बसलेली होती. चालक दारू पिऊन असल्याने त्याचे व्हॅनवर नियंत्रण नव्हते.

नागपूर : शाळा प्रशासनाचे दुर्लक्ष आणि पालकांच्या हलगर्जीपणामुळे शाळांमध्ये विद्यार्थी पोहोचवून देणारे वाहनचालक विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळत आहेत. अनेक स्कूल व्हॅनचालक झिगझॅग पद्धतीने वाहन चालवितात. काही चालक चक्‍क दारू पिऊन वाहन चालवितात. अशीच एक घटना सक्‍कदऱ्यात उघडकीस आली. सक्‍करदरा वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे एका दारुड्या स्कूल व्हॅनचालकाला अटक करून 14 मुलांचा जीव वाचविण्यात आला.


स्कूल व्हॅनचालक 

शुक्रवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास एक भरधाव स्कूल व्हॅन (एमएच 49-एटी 3337) क्रीडा चौकाकडून विमा दवाखान्याकडे जात होती. व्हॅनमध्ये शिकवणीला जात असलेली 14 मुले बसलेली होती. चालक दारू पिऊन असल्याने त्याचे व्हॅनवर नियंत्रण नव्हते. ही बाब सक्‍करदरा वाहतूकचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश चव्हाण यांच्या लक्षात आली. त्यांनी लगेच पोलिस कर्मचारी सुभाष लांडे यांना वाहन थांबविण्यास सांगितले. पोलिसांनी स्कूल व्हॅन थांबविल्यानंतर चालक अमित रामूजी खाडे (28, रा. संजय गांधी खदान, रिंग रोड) हा दारू प्यायलेला आढळला. त्याला ताब्यात घेऊन वाहन जप्त करण्यात आले. 

क्लिक करा -  ऋत्विजा, तुझ्या संवेदनशीलतेला सलाम

दारुड्या स्कूल व्हॅन चालकाला अटक 
वाहनांतील 14 मुलांच्या पालकांना फोन करून माहिती देण्यात आली. त्यानंतर पालकांनी सक्‍करदरा वाहतूक शाखेत गर्दी केली. काही विद्यार्थ्यांना वाहतूक पोलिसांनी घरी सोडून दिले. या घटनेमुळे पालकांचा हलगर्जीपणा आणि शाळा संचालकांच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांचा जीव धोक्‍यात घालून विद्यार्थ्यांची ने-आण होत असल्याची बाब उघडकीस आली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: trafic police arrested drunken school bus driver at nagpur