रेल्वे खचाखच, ट्रॅव्हल्सचेही चढे दर 

file photo
file photo

नागपूर  : दिवाळीसाठी स्वगृही परतणाऱ्यांची लगबग अंतिम टप्प्यात असल्याने रेल्वेगाड्या खचाखच भरून धावत आहेत. अधिकचे पैसे मोजूनही कनफर्म तिकीट मिळत नसल्याने अनेकांचा भ्रमनिरास झाला आहे. ट्रॅव्हल्स चालकांनी प्रवासी भाड्यात तिपटीपर्यंत वाढ केली. विमानाचे तिकीटही वधारले असले तरी ट्रॅव्हल्स आणि रेल्वेच्या तुलनेत मिळणारी सुविधा लक्षात घेता विमान प्रवास रास्त ठरणारा आहे. 
दिवाळीसाठी मुंबईला जाणाऱ्या आणि परतणाऱ्या रेल्वेगाड्यांमधील गर्दी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यातही कायम राहणार आहे. 5 नोव्हेंबरपर्यंत मुंबई मार्गावरील जवळपास सर्वच गाड्यांमधील आरक्षण संपल्याची स्थिती आहे. 12106 गोंदिया-मुंबई विदर्भ एक्‍स्प्रेस स्लिपरचे वेटिंग दीडशेच्या घरात पोहचले आहे. थर्ड एसीचे वेटिंगही 50 च्या पुढे आहे. 12860 हावडा - मुंबई गीतांजली एक्‍स्प्रेसची स्लिपरची प्रतीक्षा यादी 160 च्या पुढे आहे. थर्ड एसीचे वेटिंगही 45च्या पुढे आहे. 12810 हावडा - मुंबई मेलची स्लिपरची प्रतीक्षा यादी 97 पर्यंत, 12140 नागपूर - मुंबई सेवाग्राम एक्‍स्प्रेसमध्ये प्रतीक्षा यादी दीडशेच्या पुढे, तर प्रवाशांची सर्वाधिक पसंतीच्या 12290 नागपूर - मुंबई दुरांतोमध्ये 31 ऑक्‍टोबरपर्यंतचे वेटिंग अडीचशेच्या वर गेले आहे. पुणे मार्गावरील गाड्यासुद्धा हाऊसफुल्ल आहे. 12136 नागपूर -पुणे एक्‍स्प्रेसचे वेटिंग तब्बल 400 पर्यंत पोहचले आहे. 12849 बिलासपूर -पुणे एक्‍स्प्रेसचे वेटिंग 90 च्या घरात आहे. पुणे मार्गावरील प्रवाशांची सर्वाधिक पसंती 12130 बिलासपूर -पुणे आझाद हिंद एक्‍स्प्रेसला असते. या गाडीचे 31 ऑक्‍टोबरपर्यंतचे वेटिंग अडीचशेच्या घरात आहे. या गाडीचे थर्ड एसीचे वेटिंगही 130 च्या पलीकडे आहे. 12114 नागपूर - पुणे गरिबरथचे वेटिंग 200 च्या पुढे आहे. 
दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर खासगी बसचालकांनी दरात तिपटीपर्यंत वाढ केली आहे. पुण्यासाठी अडीच हजार ते 2 हजार 800 रुपये, नांदेड 600 रुपये, सूरतसाठी दीड ते दोन हजारापर्यंत भाडे आकारले जात आहे. 
दिवाळीच्या दिवशी मुंबई - नागपूर विमानप्रवासासाठी साडेचार हजारापासून तर मुंबईला जाण्यासाठी अडीच हजारापासून तिकीट उपलब्ध आहे. सोमवारी मुंबईला परतण्यासाठी 3 हजारापासून तिकीट उपलब्ध आहे. रविवारचे नागपूर -पुण्याचे तिकीट 4 हजार 700 पासून तर पुणे - नागपूरचे तिकीट 21 हजारापर्यंत उपलब्ध आहे. दिल्लीचे तिकीट मात्र अवघ्या 1 हजार 800 रुपयांपासून उपलब्ध आहे.  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com