महामेळाव्यासाठी निघालेली 'भाजप स्पेशल ट्रेन' पोहचली गुजरातमध्ये

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 एप्रिल 2018

नागपूर : भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनानिमीत्त आज(शुक्रवार) मुंबईत बीकेसी मैदानावर महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी भाजप कार्यकर्त्यांना घेऊन काल नागपूरहून निघालेली 'भाजप स्पेशल ट्रेन' गुजरातमध्ये भरकटली.

भाजपच्या वर्धापन दिन कार्यक्रमासाठी नागपुरातून निघालेली ट्रेन मुंबईला न पोहचता गुजरातमध्ये पोहचल्याने कार्यकर्ते नाराज झाले आहेत. जळगाव वरुन गुजरातकडे वळाल्याने ही ट्रेन मुंबई ऐवजी गुजरातमधील वालसाड या ठिकाणी पोहचली. या सगळ्या प्रकारामुळे नागपूरातील भाजप कार्यकर्ते मुंबईच्या महामेळाव्याला मुकणार आहेत. 

भाजपच्या 38 व्या स्थापना दिवसाच्या निमित्ताने मुंबईमध्ये महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यासाठी भाजपचे लाखो कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

Web Title: train from nagpur with bjp workers reached gujarat instead of mumbai