प्रशिक्षणार्थी डॉक्‍टरांकडून विद्यार्थ्याला मारहाण

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

प्रशिक्षणार्थी डॉक्‍टरांकडून विद्यार्थ्याला मारहाण
नागपूर : मेडिकल कधी रुग्णांकडून तर कधी डॉक्‍टरकडून होणाऱ्या मारहाणीबाबत नेहमीच चर्चेत असते. मात्र, सोमवारी वसतिगृह क्र. 4 मध्ये राहणाऱ्या चार प्रशिक्षणार्थी डॉक्‍टरांनी एमबीबीएसला शिकणाऱ्या तिसऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्याला मारहाण केल्याची घटना घडली. मारहाण झालेल्या विद्यार्थ्यानी अधिष्ठात्यांकडे रॅगिंग होत असल्याची तक्रार केली.

मेडिकलच्या वसतिगृह क्र. 4 मध्ये 2013 साली प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी एमबीबीएसची पदवी पूर्ण केली. यातील एक विद्यार्थी वारंवार नापास होत होता. यंदा तो पास झाला. यामुळे प्रशिक्षण कालावधी पूर्ण करीत असलेल्या प्रशिक्षणार्थी डॉक्‍टरांनी मित्र पास झाल्याच्या आनंदात वसतिगृहात पेढे वाटले. एकाच वसतिगृहात अनेक विद्यार्थी राहात असल्याने 2016 साली प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनाही पेढे दिले. त्यावर एमबीबीसच्या तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले.
मित्र पास झाला म्हणून पेढे वाटण्यावरून संभ्रम निर्माण झाला आणि दोन गटांत मारहाण झाली. प्रशिक्षणार्थी डॉक्‍टरांनी मारहाण केली. याची तक्रार अधिष्ठाताकडे केल्यास पुन्हा मारहाण करण्याचा दम दिल्याचे एमबीबीएसच्या विद्यार्थ्याने सांगितले. मात्र, एमबीबीएसच्या विद्यार्थ्यानी न जुमानता अधिष्ठाता कार्यालय गाठत कनिष्ठ विद्यार्थ्यांची रॅगिंग होत असल्याची तक्रार केली.
अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी अजनी पोलिसांना सूचना देत कुणी दोषी असल्यास कारवाई करण्याबाबत पत्र दिले आणि दोन्ही गटांमधील विद्यार्थ्यांना मुख्य वसतिगृह अधीक्षक डॉ. समीर गोलावार यांच्याकडे पाठवले. दोन्ही गटातील विद्यार्थ्यांशी चर्चा केली आणि अहवाल अधिष्ठातांना सादर केला. यानंतर चार प्रशिक्षणार्थी डॉक्‍टरांची हकालपट्टी अधिष्ठातांनी केली.

दोन गटांतील विद्यार्थ्यांचा हा वाद आहे. काही विद्यार्थ्यांना मारहाण झाल्याबाबत प्रशासनाला तक्रार मिळाली. या प्रकरणात चारही डॉक्‍टरांना तातडीने वसतिगृहातून बाहेर काढले.
- डॉ. अभिमन्यू निसवाडे,
अधिष्ठाता, मेडिकल.

Web Title: The trainee doctor assaulted the student