प्रशिक्षणार्थी विद्यार्थिनींना विषबाधा!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 जून 2019

नागपूर : दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य विकास योजनेतील 14 प्रशिक्षणार्थींची वसतिगृहात जेवण केल्यानंतर अचानक प्रकृती खालावली. विषबाधा झाल्याच्या संशय आल्याने संस्थेच्या प्रमुखांनी प्रशिक्षणार्थींना मेडिकलमध्ये हलविले. आता विषबाधेच्या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असून सोमवारी अन्न व औषध प्रशासन विभागानेही (एफडीए) वसतिगृहाची पाहणी करत विविध अन्नाचे नमुने गोळा केले. या संस्थेचे संचालन बेसिक लिमिटेड संस्थेकडून करण्यात येते.

हैद्राबादच्या बेसिक लिमिटेड या संस्थेकडून प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत उमरेड रोडवरील राधिकाताई पांडव अभियांत्रिकी महाविद्यालय येथे भाड्याने जागा घेऊन परिचारिका आणि इलेक्‍ट्रिकलचे दोन प्रशिक्षण वर्ग चालवले जात आहे. तीन महिन्यांच्या या अभ्यासक्रमासाठी यंदा अमरावती आणि भंडारा जिल्ह्यांतील विद्यार्थिनी आल्या आहेत. येथील एका वसतिगृहातच त्यांच्या राहण्याची सोय केली आहे. रविवारी (ता.9) रात्री विद्यार्थिनींनी भोजनालयात जेवण केल्यानंतर काही मिनिटांतच 14 विद्यार्थ्यांना पोटदुखी, ओकारी, हगवणीसह अशक्तपणाचा त्रास सुरू झाला. त्यामुळे वसतिगृहातील अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली. त्यांनी तातडीने प्रशिक्षणार्थींना ऑटोरिक्षातून मेडिकलच्या आकस्मिक विभागात हलवले. विषबाधेचे रुग्ण आल्याने मेडिकलने अतिरिक्त डॉक्‍टर वाढवत उपचार सुरू केला. डॉक्‍टरांनी रात्री दोन वाजतापर्यंत उपचार केल्यानंतर सर्व विद्यार्थिनींची प्रकृती स्थिर झाली. त्यानंतर त्यांना रुग्णवाहिकेतून नेत्र विभागाच्या शेजारील वॉर्ड क्रमांक 49 मध्ये हलवले. सोमवारीही संध्याकाळपर्यंत त्यांच्यावर उपचार करण्यात आले. भरती प्रशिक्षणार्थींपैकी काहींची प्रकृती सुधारल्याने रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Trainee students poisoned!