विदर्भातील पाच अधिकाऱ्यांच्या बदल्या

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 जुलै 2019

नागपूर : राज्य सरकारने आज 26 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून त्यात विदर्भातील पाच अधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यात भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी शंतनू गोयल यांचाही समावेश असून त्यांची बदली पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून झाली आहे.

गोयल यांच्या रिक्त पदावर नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. एन. बी. गीते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गीते यांच्या जागेवर पांढरकवड्याच्या (जि. यवतमाळ) एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकारी व सहयोगी जिल्हाधिकारी श्रीमती भुवनेश्‍वरी एस. यांची वर्णी लागली आहे. अमरावतीचे अतिरिक्त आदिवासी आयुक्त एम. जे. प्रदीप चंद्रन यांची नियुक्ती नाशिक विभागाचे अतिरिक्त विभागीय आयुक्त या पदावर करण्यात आली आहे. राजुरा (जि. चंद्रपूर) येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकारी व सहयोगी जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांची बदली धारणी (जि. अमरावती) येथे त्याच पदावर करण्यात आली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: transfers of five officers in Vidarbha