पूर्णा नदीच्या पूरात अडकली वाळू उपसा करणारी वाहने

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 जून 2018

तालुक्यातून वाहणाऱ्या पूर्णा नदीला 12 जूनच्या पहाटे अचानक पूर आल्याने नदीपात्रात अवैध रेती उपसा करणारे ट्रॅक्टर व ट्रॉली वाहत गेले. 

संग्रामपूर ( बुलढाणा) - तालुक्यातून वाहणाऱ्या पूर्णा नदीला 12 जूनच्या पहाटे अचानक पूर आल्याने नदीपात्रात अवैध रेती उपसा करणारे ट्रॅक्टर व ट्रॉली वाहत गेले. 

मजूरांनी पळ काढल्याने जीवित हानी झाली नाही. अकोला, अमरावती, वर्धा जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाल्याने बुलढाणा जिल्ह्यातून वाहनाऱ्या पूर्णा नदीला आज सकाळी अचानक पुर आला जळगाव, जामोद, संग्रामपुर, नांदुरा व शेगाव तालुक्यातून ही नदी वाहते, नदीपात्रात अवैध रेती उपसा करणारे खुप सारी वाहने उभी होती अचानक नदिला पुर आल्याने अवैध रेती उपसा करणाऱ्या वाहनाना बाहेर काढणे कठीण झाल्याने एक ट्रॅक्टर व ट्रॉली वाहत गेली व खड्ड्यात अडकली.

सर्व मजूर व वाहन चालकाची नदीपात्रा बाहेर निघण्यासाठी पळापळ झालीे .या मध्ये काहि वाहने बाहेर काढणे शक्य झाले  सुदैवाने जीवीतिहानी झाली नाही.

Web Title: Trapped tractor and trolly in the river Purna