‘ट्रॉमा’ परिसरात उभारले प्रतीक्षालय

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 ऑगस्ट 2018

नागपूर - मेडिकलमधील ‘ट्रॉमा केअर युनिट’मध्ये उपचार सुरू असलेल्या रुग्णांचे दोनशेहून अधिक नातेवाईक ऊन, पावसात व्हरांड्यात असतात. रुग्णांच्या नातेवाइकांची रात्र मोकळ्या आकाशाखाली, ही बाब दै. सकाळने प्रकाशात आणली. प्रतीक्षालय उभारण्यात यावे, या मागणीचा पाठपुरावा केला होता. अखेर स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने प्रतीक्षालय उभारण्यात आले. इशान्य रोटरीच्या पुढाकारातून प्रतीक्षालय उभारले. लवकरच रुग्णांच्या नातेवाइकांना येथे रात्रीचा निवारा मिळेल. 

मेडिकलमध्ये विदर्भासह मध्य प्रदेश, तेलंगण, छत्तीसगड, आंध्र प्रदेशातील ३० टक्‍क्‍यांपेक्षा अधिक रुग्ण उपचारासाठी येतात. दोन ते अडीच महिने रुग्ण येथे भरती असतो. यामुळे रुग्णाच्या नातेवाइकांना येथे निवारा नाही, यासंदर्भात दै. सकाळने वृत्त प्रकाशित केले. ट्रॉमा केअर युनिटसमोर रात्री निवारा नसल्यामुळे रस्त्यावरच रुग्णांचे नातेवाईक रात्र काढतात. तीन माळ्यांच्या ‘ट्रॉमा’त रुग्णांच्या नातेवाइकांचे बस्तानबाहेरच असते. यामुळे येथे भुरट्या चोऱ्यांनाही ऊत आला होता. उघड्यावरच जेवण करावे लागते. येथेच खरकटे टाकले जात होते. २०१७ पासून या वृत्ताचा पाठपुरावा केल्यानंतर याची दखल अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी घेऊन त्यादृष्टीने प्रयत्न केले. शासनाकडून निधी उपलब्ध झाला नाही. अखेर ईशान्य रोटरी संस्थेने प्रतीक्षालय उभारण्यास पसंती दर्शविली. एप्रिल महिन्यात भूमिपूजन झाले आणि ऑगस्टमध्ये बांधकाम पूर्ण झाले. लवकरच रुग्णाच्या नातेवाइकांसाठी प्रतीक्षालय सुरू करण्यात येईल. 

कधी बनेल सुपरमध्ये निवारा?
ट्रॉमा युनिटप्रमाणे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या नातेवाइकांचा संसार उघड्यावर फुलतो. दोन-अडीच महिने येथे नातेवाईक असतात. सुपरमध्येही एका स्वंयसेवी संस्थेने प्रतीक्षालय उभारण्यासाठी पुढाकार घेतला होता; मात्र हे प्रकरण थंडबस्त्यात आहे.

ट्रॉमा केअर युनिट परिसरातील प्रतीक्षालय दीड हजार स्क्वेअर फुटांत उभारले आहे. पाणी व स्वच्छतागृहाची व्यवस्था येथे असेल. ईशान्य रोटरी संस्थेतर्फे परिसराचे सौंदर्यीकरणही करण्यात येईल. रुग्णांच्या नातेवाइकांसाठी सोय उपलब्ध करून देणे हेच महत्त्वाचे आहे. 
-डॉ. अभिमन्यू निसवाडे, अधिष्ठाता, मेडिकल

Web Title: Trauma Care Unit in nagpur