धोकादायक, जीव मुठीत घेऊन नागरिकांचा प्रवास

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 सप्टेंबर 2019

नागपूर : वंजारीनगर ते तुकडोजी पुतळा चौकापर्यंत एका बाजूने सिमेंट रस्त्याचे काम सुरू असून, दुसऱ्या बाजूच्या डांबरी रस्त्यावरील संपूर्ण गिट्टी उखडल्याने त्यावरून वाहन घसरण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. परिणामी या रस्त्यावरून नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. एवढेच नव्हे, मोठ्या वाहनांमुळे धूळ उडत असून, नागरिकांना डोळ्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. यापेक्षा ग्रामीण भागातील रस्ते बरे, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिक व्यक्‍त करीत आहेत.

दक्षिण नागपुरातून सीताबर्डी, मेडिकल, धंतोली, रामदासपेठसह पश्‍चिम व दक्षिण-पश्‍चिम नागपुरात प्रवास करणाऱ्यांची या मार्गावर मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. हजारो नागरिक या रस्त्याने ये-जा करतात. तुकडोजी पुतळा चौक ते वंजारीनगर जलकुंभापर्यंत एका बाजूला सिमेंट रस्त्याचे काम पूर्णत्वास आले आहे. परंतु, अद्याप हा रस्ता सुरू न केल्याने वाहने दुसऱ्या बाजूने डांबरी रस्त्यावरून चालवावी लागतात. या डांबरी रस्त्यावरील गिट्टी पूर्णपणे उखडली असून, नागरिकांची दुचाकी वाहने घसरून पडण्याची शक्‍यता आहे. दुचाकीधारकांना या रस्त्यावरून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. दोन्ही बाजूंची वाहने डांबरी रस्त्यावरून धावत असल्याने रस्त्यावर मोठी गर्दी होते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Travel with a handful of lives