वरवट बकाल येथील प्रवासी निवारा जनआंदोलनाच्या रेट्यामुळे अखेर वापरात

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 ऑगस्ट 2018

सार्वजनिक बांधकाम विभागाने हा निवारा पाडला पण बांधकामाबाबत काहीच नियोजन केले नव्हते. वरवट बाजार पेठ मोठी असल्याने या ठिकाणी तालुक्यातील दररोज प्रवासी वर्गाची आणि शालेय विद्यार्थी याची गर्दी असते.

संग्रामपूर (बुलढाणा) : राजकीय दृष्ट्या चर्चेत असलेला वरवट बकाल येथील प्रवासी निवारा जनआंदोलनाच्या रेट्यामुळे अखेर वापरात सुरू झाला आहे. तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या वरवट बकाल बस थांब्यावरील प्रवासी निवारा चार वर्ष अगोदर सौंदर्यीकरण्याच्या नावाखाली पाडण्यात आला होता.

सार्वजनिक बांधकाम विभागाने हा निवारा पाडला पण बांधकामाबाबत काहीच नियोजन केले नव्हते. वरवट बाजार पेठ मोठी असल्याने या ठिकाणी तालुक्यातील दररोज प्रवासी वर्गाची आणि शालेय विद्यार्थी याची गर्दी असते. प्रवासी निवारा नसल्याने नागरिक, महिला, मुली यांना हम रस्त्यावर तासनतास उभे रहावे लागत होते. ही समस्या लक्षात घेता प्रवासी निवारा बांधकाम करावे. या मागणीसाठी जनआंदोलन करून शासनासह लोकप्रतिनिधीचे लक्ष वेधण्यात आले होते. यामध्ये सामाजिकतेच्या दृष्टीकोनातून स्थानिक नागरिकांना सोबत घेऊन संभाजी ब्रिगेडचे तरुणांनी उपोषणही केले होते. याला तालुका पत्रकार संघाने पाठिंबा दिला होता. त्यावर खासदार प्रतापराव जाधव यांनी खासदार निधीतून या निवारा बांधकामासाठी निधीची तरतूद करून दिली आणि चार वर्षानंतर सदर निवारा 15 ऑगस्ट पासून प्रवासासाठी पावसात निवारा म्हणून वापरात आल्याने आया बहिणी, प्रवासी निवाऱ्यात बसून आस्वाद घेताना दिसत आहेत.

Web Title: Traveller shelter is start because of common peoples efforts at varvat bakal