तिजोरीत 25 कोटींची भर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2016

नागपूर - जुन्या पाचशे व हजारांच्या नोटा खपविण्याच्या गर्दीत शहरातील मालमत्ताधारकांनी गेल्या पंधरा दिवसांत 25 कोटी 56 लाखांचा कर भरला. याशिवाय कधी नव्हे बाजार विभागानेही कोटीचा टप्पा गाठल्याने नोटबंदी पालिकेसाठी वरदान ठरल्याचे चित्र आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 9 नोव्हेंबर रोजी मध्यरात्रीपासून पाचशे व हजाराची नोट चलनातून बाद करण्याचा निर्णय जाहीर केला. मात्र, मालमत्ता कर, पाणी कर भरणाऱ्यांसाठी पाचशे व हजारांच्या नोटा स्वीकारण्याची मुदत वेळोवेळी वाढविली. शेवटी 24 डिसेंबरपर्यंत मुदत वाढविली होती. जुन्या नोटा खपविण्यासाठी आज शेवटचा दिवस होता. शेवटच्या दिवशी मालमत्ताधारकांनी 2 कोटी 10 लाख रुपयांची वसुली झाली. 23 नोव्हेंबरपर्यंत 23 कोटी 46 लाख रुपये महापालिकेच्या तिजोरीत जमा झाले. आज 25 कोटी 56 लाख रुपये तिजोरीत आल्याने दिलासा मिळाला. बाजार विभागानेही 1 कोटी 23 लाख रुपये गोळा केले. केंद्र सरकारने हजाराची नोट उद्यापासून स्वीकारणे बंद केले असून, पाचशेची नोट घेतली जाणार आहे. परंतु याबाबत महापालिकेला कुठलेही आदेश नाही.

पाणी करात 6 कोटी
पाणी कराने कोटींची उड्डाणे घेतली. गेल्या पंधरा दिवसांत 48 हजार 449 ग्राहकांनी 6 कोटी 15 लाखांचे जुने पाचशे व हजारांचे नोट खपविले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Treasury around Rs 25 crore