यंदा तीन महिने चालणार वृक्षलागवड

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 फेब्रुवारी 2019

अमरावती : वृक्षलागवड मोहिमेंतर्गत यंदा वृक्षलागवडीसाठी तीन महिन्यांची मुदत राहणार आहे. या तीन महिन्यांत विभागात 3 कोटी 41 लाख 35 हजार 900 वृक्षलागवडीचे उद्दिष्ट विविध विभागांना देण्यात आलेले आहे.

अमरावती : वृक्षलागवड मोहिमेंतर्गत यंदा वृक्षलागवडीसाठी तीन महिन्यांची मुदत राहणार आहे. या तीन महिन्यांत विभागात 3 कोटी 41 लाख 35 हजार 900 वृक्षलागवडीचे उद्दिष्ट विविध विभागांना देण्यात आलेले आहे.
मोहिमेच्या पहिल्या वर्षी 2 कोटी वृक्षलागवड एकाच दिवशी करण्यात आली. दुसऱ्या वर्षी 4 कोटी वृक्षलागवडीसाठी एक आठवड्याचा अवधी होता. गतवर्षी 13 कोटी वृक्षलागवड करण्यात आली. त्याला एक महिना अवधी होता. यंदा 33 कोटी वृक्षलागवडीसाठी तीन महिन्यांची मुदत आहे. 1 जुलै ते 30 सप्टेंबर 2019 या कालावधीत ही वृक्षलागवड केली जाईल. या वृक्षलागवडीसाठी विभागात एकूण 34 हजार हेक्‍टर जमिनीची गरज भासणार असून, आतापर्यंत 31 हजार 700 हेक्‍टर जागेची निवड व त्या जागेची निवड होऊन त्या जागेच्या जीओ टॅगिंगच्या कामाला सुरुवात झालेली आहे. विशेष म्हणजे संपूर्ण विभागात लक्ष्यांकानुसार आवश्‍यकता असलेल्या रोपांची निर्मिती करण्यात आलेली आहे. वृक्षलागवडीसाठी खड्डे खोदण्याची कामे 31 मार्चपूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आलेल्या आहेत. खड्डे खोदल्यानंतर चार महिन्यांच्या अवधीत खोदलेल्या मातीची धूप होईल, पर्यायाने रोपटे अधिक जोमाने वाढेल, असा त्यामागील उद्देश आहे.
वृक्षलागवडीचा सर्वांत मोठा भार ग्रामपंचायत विभागावर देण्यात आलेला आहे. वनविभाग, सामाजिक वनीकरण, त्यापाठोपाठ कृषी विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, शालेय शिक्षण विभाग, महसूल विभाग, महापालिका, उद्योग विभाग, पाणीपुरवठा विभागाचा क्रमांक आहे.

Web Title: tree plantation movement