अकोला : वृक्ष लागवडीचे खड्डेच शिल्लक

Tree plantation is not well planned in akola
Tree plantation is not well planned in akola

अकोला : वनविभागाच्या वतीने मोठा गाजावाजा करीत प्रचंड खर्च करून राज्यात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आली. परंतू लागवडीनंतर झाडांची निगा न घेतल्यामुळे सर्व रोपे करपून गेली असून, केवळ खड्डेच शिल्लक राहिली आहेत. बहुतांश ठिकाणी पाण्याअभावी रोप वाळली असून, नुसते खड्डेच शिल्लक असल्याचे बघावयास मिळत आहे.

वनविभागामार्फत जिल्हाभरात जुलै 2018 मध्ये शासनाने मोठा गाजावाजा करून राज्यातील प्रत्येक तालुक्यात वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठरवून दिले व त्यानुसार तालुक्यातील प्रत्येक गावात वृक्षारोपण करण्यात आले. मात्र, ही वृक्ष लागवड केवळ फोटोसेशन पुरती मर्यादित राहिल्याने शतकोटी वृक्ष लागवड योजनेचा बट्ट्याबोळ झाला आहे. पाण्याअभावी बहुतांश झाडे सुकली असून, वृक्ष लागवड योजना फसल्याचे दिसून येत आहे. प्रशासकीय पातळीवर वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. वऱ्हाडातील तिन्ही जिल्ह्यातील बहुतांश गावांत राजकीय पुढारी, सामाजिक कार्यकर्ते यांनी सुद्धा वृक्ष लागवड केली. परंतू वृक्षारोपणानंतर या झाडांच्या संगोपनाकडे पूर्णत: दुर्लक्ष झाल्यामुळे वृक्ष लागवड योजनेतील मोजकेच झाड जिवंत नसल्याचे दिसून येत आहे.

शासनाने द्यावे लक्ष -
पर्यावरणाशी संबंधित संभाव्य धोका टाळण्यासाठी अत्यंत आवश्यक असलेल्या वृक्षलागवड योजनेतच जर प्रशासन हलगर्जीपणा करीत असेल तर योजनेचा उद्देश कसा सफल होणार, हा प्रश्नच आहे. शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com