खड्ड्यांमध्ये धान्यरोपे लावून खड्ड्यांचा निषेध

नंदकिशोर वैरागडे 
शुक्रवार, 27 जुलै 2018

कोरची : कोरची हे तालुक्याचे मुख्यालय असलेल्या नगरपंचायतीत मुख्य रस्त्यावर भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पडलेल्या खड्ड्यांमध्ये धान्याचे रोप लावून नगरपंचायतीचा निषेध नोंदवला आहे. 

अवघे पाच हजार लोकसंख्या असलेल्या कोरची नगरपंचायतीत भाजपचे नगराध्यक्ष आहेत. या नगरपंचायतीने गेल्या अडीच वर्षांत 30 लाख रुपयांचे हाय मास्टर लाईट लावून विकास शोधणयाचा प्रयत्न केला, पण हाय मास्टरच्या प्रकाशामध्ये विकास दिसला नाही म्हणून 17 लाख रुपयांची एलईडी लाईटवर खर्च केला पण विकास आढळला नाही.

विकास शोधण्यासाठी लाईट वर खर्च करण्याव्यतिरिक्त रस्त्यांची दुरुस्ती करून चांगले रस्ते दिले असते बरं झालं असतं अशा भावना भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केली कोरची नगरपंचायतीच्या नियोजनशून्य कारभारामुळे कोरची येथील रस्त्यांची बकाल अवस्था झाली असून अंतर्गत रस्त्यांची कामे सिमेंट रस्त्याचे करत असताना घरांची उंची न बघता सिमेंट रस्त्याचे काम केली जात आहेत त्यामुळे घर खाली वर रस्ता उंच असल्याने रस्त्यावरील संपूर्ण पाणी मातीचे घर असलेल्या नागरिकांच्या घरात गुडघ्यावर पाणी साचून आहे.

कोरची नगरपंचायत घनकचरा व्यवस्थापनाची 18 लाख रुपयांची निविदा काढतो त्यात नालेसफाई रस्त्यावरील सफाई हे काम करत करण्यासाठी 18 लाख रुपयांचा निधी खर्च केला जातो पण नगरपंचायत चे पदाधिकारी व ठेकेदार त्यांची भागिदारी असल्याने चारशे ते पाचशे मीटर रस्त्यावरून झाडझूड करून 18 लाख रुपयांचा निधी फस्त केला जातो आजही कोरची नगरपंचायत चे नाल्या तुडुंब भरून आहेत त्यांची सफाई केली जात नाही या संपूर्ण प्रकाराची जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेऊन चौकशी करण्याची मागणी भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या पदाधिकारी जितेंद्र सहारे, आशिष अग्रवाल, सिधारथ  राऊत, चेतन कराडे, वशिम शेख, अभिजित निंबेकर, आदी भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

Web Title: tree sowing in pot holes and show oppose