आदिवासी बांधवांनी खनिज व संसाधन रखवालीची घेतली शपथ 

मनोहर बोरकर
सोमवार, 22 ऑक्टोबर 2018

एटापल्ली : तालुक्यातील सुरजागड लोहखनीज पहाडी परिसरातील विर बाबूराव शेडमाके स्मारक भवन प्रांगनात सात ग्रामपंचायत क्षेत्राच्या सत्तर गावातील ग्रामसभांच्या इलाखा समितिच्या वतीने (ता 21) रविवारी विर बाबूराव शेडमाके शहीद दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला होते. यावेळी  ग्रामपंचायत गर्देवाडा, गट्टा, जांबिया, पुरसलगोंदी, मेड्री, वांगेतुरी व जवेली अशा सात ग्रामपंचायत क्षेत्राच्या सत्तर गावातील नागिरिकांसह अहेरी, भमरागड, मुलचेरा, सिरोंचा, धानोरा तालुक्यातील व छत्तीसगड़ राज्यातील ग्रामसभा प्रतिनिधि मोठ्या संख्येने उपस्थित होते,

कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून बोलतांना सुरजागड इलाका पट्टीचे ग्रामसभा अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य सैनु गोटा यांनी विर बाबूराव शेडमाके यांनी प्राणाची आहुती देऊन सुरजागड दमकोंडावाही, बांडे व चंद्राखंडी अशा परिसरात बारा ते तेरा लोहखनीज खानी व त्यावरील संसाधनाची रखवाली केली आहे. हीच संसाधने केंद्र व राज्य शासन ग्रामसभांना विश्वासात न घेता बड्या कंपन्यांना कवडिमोल किंमतीत विक्री करत आहे. गेली चार वर्षापासून लॉयलड्स मेटल कंपनीच्या वतीने सुरजागड पहाडी वरील लोहखनीज बळजबरीने उत्खनन करुण चंद्रपुर जिल्ह्यातील घुग्गुस स्टील उद्योगाला पुरवठा केला जात आहे. त्यामुळे विर बाबूराव शेडमाके व इतर आदिवासी दैवत व पूर्वजांनी जतन केलेली नैसर्गिक साधन संपत्ति नष्ट होऊन या भागातील अदिवासींवर विस्थापित होण्याच्या वेळ आली आहे. त्यामुळे आलेला धोका लक्षात घेऊन पूर्वजांनी जतन कलेल्या साधन संपत्ती व संसाधने जतन होण्यास व अदिवासींचे न्याय्य हक्क मिळविण्यासाठी तिव्र लढ़ा उभरणी करून आंदोलन करण्याचे आव्हान उपस्थितांना केले. नागरिकांनी लॉयलड्स मेटल चले जाओ, जल जंगल जमीन हमारी है, अशा घोषणा देत तिव्र आंदोलन उभरण्यास संमती दर्शविली आहे.

सकाळी अकरा वाजता सुरजागड गावातुन भव्य रैली द्वारे आदिवासी बांधव पहाड़ी परिसर स्थित विर बाबूराव शेडमाके स्मारक भवन येथे शहीद व  कुलदैवत प्रतिमा पूजन करून सभा घेण्यात आली यावेळी सरपंच कल्पना आलम कार्यक्रमाच्या अध्यक्ष तर पंचायत समिति सदस्य शिला गोटा ह्या प्रमुख अतिथि म्हणून उपस्थित होत्या, प्रस्ताविक मंगेश नरोटी, यांनी व सूत्रसंचालन लक्ष्मण नवडी केले जिल्ह्यातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय हेडरीच्या वतीने भव्य आरोग्य मेळावा सुरजागड सामाजिक गोटून भवन परिसरात आयोजिल करण्यात आला होता यावेळी बालरोग तज्ञ डॉ. चरणजीत सिंह सलुजा, नेत्र रोग तज्ञ डॉ चेतन खुटेमाटे, अस्थीरोग तज्ञ डॉ. हेमंत पुट्ठेवार, यांनी विविध आजारी सहासे 54 रुग्णाची तपासणी करुण औषध पुरवठा व पचाशे चौदा चश्म्यांचे निशुल्क वितरण करण्यात आले आहे.            
यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी शशिकांत भोसले, पोलिस निरीक्षक सुदर्शन आवारी, पोलिस उपनिरीक्षक अमित पाटिल, पोलिस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Tribal brothers took oath of taking care of mineral and resource