'मोदींच्या दृष्टिकोनामुळे आदिवासींचा विकास'

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 फेब्रुवारी 2019

नागपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टिकोनामुळेच आदिवासी व नक्षलग्रस्त भागांचा विकास जलदगतीने होत असल्याचा उल्लेख मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज गडचिरोलीत केला.

नागपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टिकोनामुळेच आदिवासी व नक्षलग्रस्त भागांचा विकास जलदगतीने होत असल्याचा उल्लेख मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज गडचिरोलीत केला.

येथील विविध विकासकामांचे भूमिपूजन तसेच आदिवासींना ट्रक वाटपाचा कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला. या वेळी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामुळे देशाचा विकास कसा होत आहे, याचा उल्लेख केला. ते म्हणाले, 'गेल्या 20 वर्षांत प्रथमच विकासाची दारे गडचिरोलीत उघडली गेली आहेत. विविध योजना गडचिरोलीत सुरू होत आहे. यामुळे आदिवासींना ट्रक देण्याचा निर्णय घेतला आहे.''

गडकरी म्हणाले, 'मोदींच्या योजनांमुळे देशातील दुर्गम भागातसुद्धा रस्ते होत आहे. गडचिरोली जिल्ह्यात विकास करण्यासाठी वन कायद्यांमुळे अनेक अडचणी येत होत्या. यातून मार्ग काढण्यासाठी सिंचन विहिरी, पूल व बंधाऱ्यांच्या कामावर विशेष लक्ष दिले जात आहे.''


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tribal Development by Narendra Modi angle Devendra Fadnavis