आदिवासी पित्याने केला मुलीचा एक लाखात सौदा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 मे 2018

नरखेड - तालुक्‍यांतर्गत येणाऱ्या खरसोली येथील एका आदिवासी पित्याने आपल्या अल्पवयीन मुलीचा विवाह दलालांच्या मध्यस्थीने लावला. एक लाख रुपयांच्या लालसेने १७ वर्षीय मुलीला मध्य प्रदेशातील रामपाल मंगिलाल पाटीदार (वय ४०, सिरसोई, ता. सुमनेर, जि. शाजापूर) याच्याशी गळ्यात हार घालून खरसोली येथील सटवामाय मंदिरात विवाहबद्ध केले.

नरखेड - तालुक्‍यांतर्गत येणाऱ्या खरसोली येथील एका आदिवासी पित्याने आपल्या अल्पवयीन मुलीचा विवाह दलालांच्या मध्यस्थीने लावला. एक लाख रुपयांच्या लालसेने १७ वर्षीय मुलीला मध्य प्रदेशातील रामपाल मंगिलाल पाटीदार (वय ४०, सिरसोई, ता. सुमनेर, जि. शाजापूर) याच्याशी गळ्यात हार घालून खरसोली येथील सटवामाय मंदिरात विवाहबद्ध केले.

दलालांच्या मध्यस्थीने स्वतःच्या पुत्रीला एक लाख रुपयांच्या लालसेने परप्रांतात पाठविणाऱ्या पित्याच्या क्रूर कृत्यावर एका निनावी फोनद्वारे नरखेड पोलिस निरीक्षक दिलीप मसराम यांना माहिती देताच ते आपल्या ताफ्यासह खरसोली सटवामाय मंदिरात दाखल झाले. त्यांनी अल्पवयीन मुलीची सुटका करून पित्यासह एकूण ११ आरोपींना गजाआड केले.

याप्रकरणी मुख्य दलाल मनोहर भीमराव गजभिये (३५, खरसोली), परसराम सिंगू तुमडाम (४०, गडमऊ ह. मु. खरसोली), सतीश नामदेव तायवाड े(३९, खरसोली), भीमराव माणिक वरखडे यांच्या मध्यस्थीने परसराम सिंगू तुमडाम याने १ लाख रुपयांच्या लालसेने आपल्या १७ वर्षीय मुलीला मध्य प्रदेशात विक्री करण्याच्या क्रूर बेत आखला. त्याच्या कृत्यावर ठाणेदार दिलीप मसराम व सहकारी पोलिसांच्या दक्षतेमुळे अखेर पडदा पडला. 

पोलिसांनी खरसोली येथील सटवामाय मंदिरात छापा घालून अल्पवयीन मुलीची सुटका केली विवाहाचे सर्व साहित्य जप्त केले. पिता परसराम सिंगू तुमडाम याने मुख्य दलाल मनोहर भीमराव गजभिये, सतीश नामदेव तायवाडे, भीमराव माणिक वरखडे, भीमराव कुंभरे यांच्या मध्यस्थीने स्वतःच्या अल्पवयीन मुलीचा सौदा करून तिला विवाहबद्ध केले. तिच्या आधारकार्ड व शाळा सोडल्याच्या दाखल्यावरून मुलीचे वय १७ वर्षे १० महिने असल्याचे आढळले. त्यानुसार आरोपी परसराम तुमडाम, सतीश तायवाडे, रामविलास भद्रीलाल पाटीदार (३८, हटोला), मानसिंग बाबूलाल मालवी (४०, भंडावत), शंकर हरीसिंग वर्मा (३४, भोजपुरिया), नारायण दयाराम सर्याम (४५, गदमऊ), मंगिलाल भवरलाल पाटीदार (३९), युवराज उपासराव कुंभरे (४५, महेर खापा), भीमराव माणिक वरखडे आदींना अटक करण्यात आली.

Web Title: tribal father made a daughter deal in one Lakh rupees crime