Video : 'लालपरी'वर स्वार होणार आदिवासी कन्या!

tribal girls appointed as a drivers of ST
tribal girls appointed as a drivers of ST

यवतमाळ : महिला सर्वच क्षेत्रांत पुढे येत असताना आता प्रथमच परिवहन महामंडळात यवतमाळ जिल्ह्यातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील मुलींना वाहनचालक म्हणून नियुक्ती देण्यात येणार आहे. यासाठी निवड झालेल्या मुलींच्या अभ्यासपूर्व प्रशिक्षणाला प्रारंभ झाला. 

राज्यातही महिलांना एसटी चालक म्हणून संधी द्यावी, अशी विनंती महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याकडे केली होती. त्यांनी ती मान्य केली आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून राज्य परिवहन महामंडळात विशेष बाब म्हणून अनुसूचित जमाती प्रवर्गातील महिला चालकांची भरती करण्याची घोषणा केली.

आदिवासी बहुल यवतमाळ जिल्ह्यातील किमान शंभर मुलींची भरती करण्याचे उद्दिष्ट होते. मात्र, हे आव्हान स्वीकारण्यासाठी केवळ 25 मुली पुढे आल्या. त्यांच्या निवास, भोजनाची व्यवस्था करून त्यांना स्थानिक पातळीवर प्रशिक्षण देण्यात आले. त्यांचे हलके आणि अवजड वाहनचालक परवाने काढण्यात आले. विविध तांत्रिक अडचणी पार करीत एक वर्षानंतर यातील 21 मुलींचे चालकपूर्व प्रशिक्षण सुरू झाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com