आदिवासी विद्यार्थ्यांना मोफत वैद्यकीय प्रवेश परीक्षा प्रशिक्षण

आदिवासी विद्यार्थ्यांना मोफत वैद्यकीय प्रवेश परीक्षा प्रशिक्षण

गडचिरोली : लिफ्ट फॉर अपलिफ्टमेंट (एलएफयू), पुणे व ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे (Dr. Prakash Amte) यांच्या लोकबिरादरी प्रकल्पाच्या संयुक्त विद्यमाने गडचिरोली व मेळघाट जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय प्रवेश परीक्षेसाठी मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यातून विद्यार्थ्यांचा बौद्धिक, शारीरिक आणि मानसिक विकास करण्याचा मुख्य उद्देश आहे. या प्रकल्पाद्वारे गडचिरोली तसेच मेळघाट भागातील आदिवासी विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षण (Medical education) घेता यावे आणि भविष्यात अनेक चांगले डॉक्‍टर्स तयार व्हावेत या ध्येयाने प्रेरित होऊन ‘उलगुलान’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. (Tribal students will get free medical entrance exam training)

लोकबिरादरी प्रकल्प गेली ४८ वर्षे गडचिरोलीत गुणवत्तापूर्ण शिक्षण देत आहे. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण संरक्षण, पाणलोट विकास व महिला सबलीकरण याद्वारे दुर्गम भागात विकासकामांचा अनुभव असलेली संस्था आहे. तसेच लिफ्ट फॉर अपलिफ्टमेंट, पुणेच्या अथक परिश्रमाने मागील पाच वर्षांत ५०+ एमबीबीएस, १५+ बीडीएस, २०+ बीएएमएस, २०+ बीएचएमएसला विद्यार्थ्यांनी प्रवेश मिळवले आहेत. खास मेळघाटातील विद्यार्थ्यांसाठी गेल्या तीन वर्षांपासून लिफ्ट फॉर अपलिफ्टमेंट (एलएफयू) पुणे यांच्यामार्फत ‘उलगुलान’ नावाने वेगळी बॅच चालवली जाते.

आदिवासी विद्यार्थ्यांना मोफत वैद्यकीय प्रवेश परीक्षा प्रशिक्षण
कोरोना काळात तत्काळ पैसे हवेत? जाणून घ्या, बचत खात्यातून कसे काढायचे पैसे

मागील वर्षी (एनईईटी २०२०) ‘उलगुलान’ बॅचने मेळघाटात ऐतिहासिक निकाल लावला होता. त्यात एकूण १८ जण डॉक्‍टर होत आहेत. यात ८ एम.बी.बी.एस, ४ बी.डी.एस, ४ बी.ए.एम.एस आणि २ बी.एच.एम. एस यांचा समावेश आहे. ‘उलगुलान’च्या माध्यमातून दुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थी आता शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येत आहेत.

यावर्षीपासून गडचिरोली व मेळघाटातील ३० विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची निवड प्रवेश परीक्षा व मुलाखत घेऊन करण्यात येते. तसेच विद्यार्थ्यांची प्रशिक्षणासोबत निवासाची व जेवणाचीसुद्धा मोफत सोय करण्यात येत आहे. दोन्ही संस्थांच्या अनुभवाचा व संसाधनांचा या उपक्रमाला निश्‍चितच खूप फायदा होणार असल्याचे मत लोकबिरादरी प्रकल्पाचे संचालक अनिकेत आमटे यांनी व्यक्त केले आहे. एनईईटी २०२३ करिता, म्हणजेच शैक्षणिक सत्र २०२१ ते २०२३ या दोन वर्षांकरिता नोंदणी करण्यास सुरुवात झाली आहे. सविस्तर माहितीसाठी ७७२००३३००७ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहनही अनिकेत आमटे यांनी केले आहे.

आदिवासी विद्यार्थ्यांना मोफत वैद्यकीय प्रवेश परीक्षा प्रशिक्षण
चंद्रशेखर बावनकुळे अचानक मौनात! राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा

काय आहे उलगुलानचा अर्थ?

‘उलगुलान’ हा शब्द मजेशीर वाटत असला, तरी आदिवासी बोलीभाषेतील या शब्दाचा अर्थ अधिक गहन व गंभीर आहे. आदिवासी भाषेत उलगुलान म्हणजे क्रांती होय. या उपक्रमाच्या माध्यमातून एकप्रकारे शैक्षणिक क्रांतीच करण्यात येत असल्याने या उपक्रमाला ‘उलगुलान’ असे नाव देण्यात आले आहे.

(Tribal students will get free medical entrance exam training)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com