आदिवासी मुलांच्या अडचणी सोडवणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 जुलै 2018

नागपूर - आदिवासी युवक प्रश्‍न मांडण्यासाठी नाशिकहून मुंबईकडे पायी निघाले होते. त्यांच्या प्रश्‍नावर तातडीने बैठक घेण्यात येईल. मुलांवर अन्याय होणार नाही, याची काळजी सरकार घेत आहे. या संदर्भात विभागाचे मंत्री, संबंधित आमदार व अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेऊन समस्या सोडविण्यात येतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.

आदिवासी विद्यार्थ्यांची वसतिगृहातील खानावळ बंद करून डीबीटी पद्धतीतून पैसे देण्यात येतात. दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना याचा लाभ होत नाही. ही समस्या सोडवावी यासाठी विद्यार्थ्यांचा मार्च निघाला. मात्र, पोलिसांकडून दपडशाहीचा वापर करून विद्यार्थ्यांना घरी बळजबरीने पोचवून देण्यात येत असल्याचा विषय आमदार दिलीप वळसे-पाटील, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत चर्चेला आणला. यावर निवेदन करताना मुख्यमंत्री बोलत होते.

Web Title: tribal youth issue solve devendra fadnavis