गडचिरोली - ट्रकला टाटा सफारीचा धडक, 5 जण ठार तर 4 जण जखमी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 एप्रिल 2018

गडचिरोली : आरमोरी तालुक्यातील चुरमुरा गावाजवळ उभ्या असलेल्या ट्रकला टाटा सफारी वाहनाची धडक बसली. या धडकेत टाटा सफारी वाहनामधील 5 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर 4 जण गंभीर जखमी झाल्याचे कळते. 

जखमींना गडचिरोली सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. ही घटना रात्री 11 वाजताची असून वाहनात एकूण 9 लोक असल्याची माहिती आहे. टाटा सफारी वाहन एम एच 40 ए सी 0335 या क्रमांकाची असून हे वाहन चंद्रपूर जिल्ह्यातील प्रशांत रणदिवे यांच्या मालकीचे असल्याची माहिती आहे.

Web Title: truck and car accident 5 dies 4 injured

टॅग्स