esakal | यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेवर महाविकास आघाडीची सत्ता; अध्यक्षपदी टिकाराम कोंगरे
sakal

बोलून बातमी शोधा

Tukaram Dongre as the Chairman of Yavatmal District Central Bank

बंदद्वार झालेल्या बैठकीत अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीवर चांगलाच खल झाला. खासदार गटाने आक्रमक पवित्रा घेतला. त्यामुळे वणी तालुक्यातून निवडून आलेल्या टिकाराम कोंगरे यांच्या नावावर एकमत झाले. तर उपाध्यक्षपदासाठी सेनेकडून संजय देरकर, राष्ट्रवादीच्या कोट्यातून वसंत घुईखेडकर यांचे नाव पुढे आले.

यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेवर महाविकास आघाडीची सत्ता; अध्यक्षपदी टिकाराम कोंगरे

sakal_logo
By
राजकुमार भीतकर

यवतमाळ : तब्बल तेरा वर्षांनंतर पार पडलेल्या यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेत महाविकास आघाडीची सत्ता आली आहे. अध्यक्षपदाची निवडप्रक्रिया सोमवारी (ता. चार) पार पडली. अध्यक्षपदी काँग्रेसचे टिकाराम कोंगरे, उपाध्यक्षपदी शिवसेनेच्या कोट्यातून संजय देरकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे वसंत घुईखेडकर यांची वर्णी लागली आहे.

महाविकास आघाडीचे सर्वाधिक १६ संचालक निवडून आल्याने त्यांचीच सत्ता येणार हे निश्‍चित होते. मात्र, अध्यक्ष कोण होणार याकडे सहकार वर्तुळाचे लक्ष लागले होते. अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीवर एकमत होण्यासाठी निवडणूक प्रक्रियेपूर्वी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडली.

विदर्भातल्या ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा

यावेळी पालकमंत्री संजय राठोड, खासदार बाळू धानोरकर, काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे, माजी आमदार ख्वाजा बेग, आमदार डॉ. वजाहत मिर्झा, माजी आमदार वामनराव कासावार यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेचे नेते उपस्थित होते.

बंदद्वार झालेल्या बैठकीत अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीवर चांगलाच खल झाला. खासदार गटाने आक्रमक पवित्रा घेतला. त्यामुळे वणी तालुक्यातून निवडून आलेल्या टिकाराम कोंगरे यांच्या नावावर एकमत झाले. तर उपाध्यक्षपदासाठी सेनेकडून संजय देरकर, राष्ट्रवादीच्या कोट्यातून वसंत घुईखेडकर यांचे नाव पुढे आले.

नामांकन दाखल करण्याच्या प्रक्रियेला उशीर होत असल्याने संजय देशमुख यांनी आक्षेप घेतला. भाजपकडून चाचपणी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यात त्यांना यश आले नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली. अखेर निवडणूक निर्णय अधिकारी रमेश कटके यांनी निवडीची घोषणा केली.

अधिक माहितीसाठी - गाढ झोपेत असताना आला मोठा आवाज, घराबाहेर धाव घेताच दिसलं थरारक दृश्य

फॉर्म्युल्यावर मतमतांतरे

अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीबाबत नेत्यांनी बैठकीत दोन व तीन वर्षांचा फॉर्म्युला मांडला. त्यावर चर्चा झाली. दोन वर्षे कोंगरे यांना तर पुढील तीन वर्षे मनीष पाटील यांना अध्यक्षपद देण्याचा फॉर्म्युला ठरला आहे. उपाध्यक्षपदाबाबतही हाच फॉर्म्युला राहणार आहे. शिवसेना नेत्यांनी या फॉर्म्युल्याला दुजोरा दिला. काँग्रेसच्या एका संचालकाने असे काही होणार नाही, शब्द पाळला जाईल, याची शाश्‍वती कोण देणार, अशा शब्दात नाट्यमय घडलेल्या घडामोडीवर भाष्य केले.

पक्षीय बलाबल

  • काँग्रेस - नऊ
  • राष्ट्रवादी - चार
  • शिवसेना - तीन
  • अपक्ष - दोन
  • सहकार विकास आघाडी - तीन

अधिक वाचा - पुणे- नागपूर शिवशाहीत आढळलं संशयास्पद पार्सल; चालकानं बॉक्स उघडताच सरकली पायाखालची जमीन

बँकेचा सदस्य गरीब शेतकरी
जिल्हा मध्यवर्ती ही शेतकऱ्यांची बँक आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी महाविकास आघाडी कटिबद्ध आहे. शेतकऱ्यांसाठी असलेल्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यात येतील. बँकेचा सदस्य गरीब शेतकरी आहे. त्यांना कुठेही त्रास होणार नाही. प्रत्येक सभासद समाधानी राहील, असा आमचा प्रयत्न राहणार आहे.
- टिकाराम कोंगरे
अध्यक्ष, जिल्हा मध्यवर्ती बँक, यवतमाळ

संपादन - नीलेश डाखोरे