तुळशीच्या लग्नाला हरभरा भाजीचा वांदा

tulsi
tulsi

गांधीग्राम (जि.अकोला) ः तुळशीच्या लग्नाचा दिवसा निमित्ताने घरोघरी धामधूम असते. यासाठी लागणारे सर्व साहित्य गोळा करण्यात येतात. मात्र, यंदा लग्नाला लागणारी हरभऱ्याची भाजी मिळणार नाही. कारण अजूनही हरभऱ्याची पेरणी कोणी केली नाही. त्यामुळे तुळशी विवाहात महत्त्व असणारी हरभरा भाजी यंदा दिसेनाशी झाली आहे.

दिवाळी संपली की, सर्वांना वेध लागतात ते तुळसीच्या लग्नाचे.. शुभंकर पावलांनी येणारी दिवाळी सुखाचा रेशीम धागा जगण्याला जोडून देते. प्रत्येकाची जगण्यासाठी रोजची धावपळ सुरूच असते. मग त्यात चिंता, व्यथा या तर नेहमीच्याच असतात. दिनक्रमामधील धावपळ, दगदग, ताणतणाव यांनी व्यापलेल्या आयुष्यात हे सण मनाला उभारी देतात. त्यात दिवाळी म्हणजे दिव्यांचा उत्सव मनातील अंधार दूर करून प्रकाशाकडे वाटचाल करा, असा संदेश देणारा आणि मग ती संपली की लगबग सुरू होते ती तुळसीच्या लग्नाची... कार्तिक शुद्ध एकादशीपासून तुलसी विवाह प्रारंभ होऊन कार्तिक पौर्णिमेपर्यंत हा विधी चालतो.

बोर, भाजी, आवळा असे तीन मुख्य वाण तुळशीच्या लग्नात वापरण्यात येतात. बोर आणि आवळा हे सद्या बाजारात मिळतीलही मात्र शेतकऱ्याच्या शेतात पेरणी करण्यात आलेला हरबरा मात्र यंदा लग्नाला मिळणार नाही. तुळशीच्या लग्नानंतर लग्नसराईची मोठी धुमधाम लागते. त्यामुळे प्रत्येकालाच वाटते की, तुळशीचे लग्न ज्याप्रमाणे थाटात लावल्यास आपल्याही घरातील लग्न तसेच थाटात होईल. कारण तुळशीच्या लग्नापासूनच खऱ्या लग्न कार्यायाला सुरुवात होते.

पेरणीला उशीर झाल्याने भाजी नाही
यंदा प्रथमच पाऊस लांबल्यामुळे पेरणीला उशीर झाला. त्यातच सोयाबीन, तुर, उडीद, मूग यासारख्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे रब्बी पेरणीला सुरुवात झाली नाही. हरभरा पेरणीच झाली नसल्याने तुळशीच्या लग्नाला लागणारी हरभऱ्याच्या कोवळ्या पानांची भाजी मिळणार नाही.

हरभऱ्याच्या भाजीचे महत्त्व
शेतकऱ्याने हरभरा पेरणी केल्यानंतर त्याचे झाडं तुळशीच्या लग्नापर्यंत तीन ते पाच इंच मोठे होतात. हेच झाडं खुडून घेण्यात येतात व ते भाजी म्हणून तुळशीच्या लग्नाला वापरण्यात येतात. तुळशी विवाहाचे संदर्भ आणि आरोग्याच्या दृष्टीने हरभरा भाजीचे महत्त्व अधिक असल्याचे जाणकार सांगतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com