मंत्र्यांच्या घरात ट्रॅक्‍टरभर तूर टाकणार - बच्चू कडू 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 एप्रिल 2017

अकोला - नाफेड तूर खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांच्या अडवणुकीविरोधात प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी एल्गार पुकारला आहे. सरकारने शेतकऱ्यांची तूर तातडीने खरेदी सुरू केली नाही तर सरकारमधील प्रत्येक मंत्र्यांच्या घरात ट्रॅक्‍टरभर तूर टाकण्याचा इशारा आमदार कडू यांनी दिला आहे. त्यामुळे तूर खरेदीचा प्रश्न अधिक पेटणार असल्याने सरकारसमोरच्या अडचणी वाढणार आहेत. 

आठ दिवसांच्या नाममात्र मुदतवाढीनंतर नाफेड तूर खरेदी केंद्र शनिवारी (ता.22) बंद करण्यात आले. अजूनही शेतकऱ्यांची लाखो क्विंटल तूर विक्री व्हायची आहे. शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नावर" सीएम टू पीएम' आसूड यात्रा काढणारे आमदार बच्चू कडू यांनी तूर खरेदीच्या मुद्यावर सरकारला धारेवर धरले आहे. शासनाचे धोरण शेतकरी विरोधी असल्याचे म्हणत शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्या सरकारमधील सर्व मंत्र्यांच्या घरात ट्रॅक्‍टरभर तूर टाकण्याचा इशारा आमदार कडू यांनी दिला आहे. शेतकरी हिताच्या गप्पा करणाऱ्या कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही आमदार कडू यांनी केली आहे. 

मोदीजी, शेतकऱ्यांच्या "मन की बात सुनो' 
डिजिटल इंडिया, शायनिंग इंडियांचा दिंडोरा पिटणाऱ्या भाजप सरकारने शेतकऱ्यांना "बूरे दिन' आणले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी केवळ "मन की बात' करतात. मात्र, त्यांना शेतकऱ्यांची "मन की बात' अद्यापही कळलेली नाही. त्यामुळे मोदीजी, आधी शेतकऱ्यांचे म्हणणे ऐका, अशी मागणी बच्चू कडू यांनी केली आहे. 

Web Title: tur issue in akola