तुरीला मुदतवाढीची प्रतीक्षा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 मे 2018

अमरावती - तूरखरेदीला पुन्हा मुदतवाढ मिळावी, अशी मागणी असली तरी खरेदीचे आदेश अद्याप निर्गमित झालेले नसल्याने शेतकऱ्यांसह मार्केटिंग फेडरेशन अडचणीत सापडले आहे. दरम्यान, खरेदी करण्यात आलेल्या तुरीसाठी बारदान्यांची व्यवस्था झाली असून, जागा मिळेल तेथे माल पाठविण्यात येत असल्याचे जिल्हा मार्केटिंग फेडरेशनचे विपणन अधिकारी रमेश पाटील यांनी सांगितले. मंगळवारी तूरखरेदीची मुदत संपली, त्या वेळी 26 हजारांवर शेतकऱ्यांची तूर शिल्लक होती. ही तूर खरेदी करण्यास पुन्हा मुदतवाढ मिळावी, अशी मागणी करण्यात आली.
Web Title: tur purchasing time period

टॅग्स