दोन दिवसांत तूर खरेदी सुरू करणार - जिल्हाधिकारी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 एप्रिल 2017

धामणगावरेल्वे (जि. अमरावती) - बाजार समितीमधील बंद पडलेली तूर खरेदी येत्या दोन दिवसांत पुन्हा सुरू करणार असल्याचे जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी सांगितले. एफसीआयला यासंदर्भात त्यांनी निर्देश दिले आहेत. 

धामणगावरेल्वे (जि. अमरावती) - बाजार समितीमधील बंद पडलेली तूर खरेदी येत्या दोन दिवसांत पुन्हा सुरू करणार असल्याचे जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी सांगितले. एफसीआयला यासंदर्भात त्यांनी निर्देश दिले आहेत. 

येथील बाजार समितीमध्ये एफसीआय हमीभावाने तूर खरेदी करीत होती. मात्र, बारदाना संपल्याने त्यांनी खरेदी बंद करीत असल्याचे जाहीर केले. याचा लाभ व्यापाऱ्यांनी उचलून कमी भावाने तूर खरेदीचा सपाटा सुरू केला. हमीभावापेक्षा कमी ३१०० ते ४२०० रुपये दराने शेतकऱ्यांची तूर खरेदी केल्या जाऊ लागली. याविरुद्ध बाजार समितीचे माजी सभापती श्रीकांत गावंडे, संचालक प्रशांत सबाने, अविन टेकाडे यांनी बाजार समितीच्या आवारात धरणे आंदोलन सुरू केले.

शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी किरण गित्ते यांना भेटून याबाबत माहिती दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी शासकीय तूर खरेदी करण्याचे निर्देश दिले. यानंतर शिष्टमंडळास येत्या ४८ तासांत तूर खरेदी सुरू करण्यात येईल, असे आश्‍वासन दिले. शिष्टमंडळात पंचायत समितीचे माजी उपसभापती अतुल देशमुख, नितीन कनोजिया, प्रशांत वानखडे, पंकज वानखडे, गोपाल मांडूळकर, चांदूररेल्वे बाजार समितीचे सभापती प्रभाकर वाघ, माजी जि. प. सदस्य गणेश आरेकर यांचा समावेश होता.

Web Title: tur purchasing in two days