अकोल्यात बारा अनाधिकृत बोअर केल्या सार्वजनिक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 मे 2018

अकोला - जुने शहरातील प्रभाग क्रमांक नऊमध्ये नागरिकांना सार्वजनिक बोअरवर अनाधिकृत ताबा मिळवून खासगी वापर सुरू केला होता. त्याविरोधात महापालिका जलप्रदाय विभागाने कारवाई करून १२ बोअर सार्वजनिक वापरासाठी खुल्या केल्यात. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

शहरात पाणीटंचाईमुळे एकीकडे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकावे लागत आहे. दुसरीकडे नागरिकांनी सार्वजनिक वापरासाठी मनपाने तयार करून दिलेल्या बोअरवर ताबा करून खासगी वापर सुरू केला होता. ही बाब मनपा प्रशासनाच्या लक्षात आल्यानंतर प्रभाग क्रमांक नऊमध्ये कारवाई करून सर्व १२ बोअर सार्वजनिक वापरासाठी खुल्या करण्यात आल्यात.

या भागात केली कारवाई
प्रभाग क्रमांक नऊमधील गुलजारपुरा, रामपीरनगर, नेहरूनगर, छबनमानगर, खैर मोहम्मद प्लॉट, भगतवाडी आदी भागात नागरिकांनी सार्वजनिक बोअरवर ताबा केला होता. मनपाने तेथे गुरुवारी कारवाई केली.

नगरसेवकांनी वेधले होते लक्ष
मनपाच्या सार्वजनिक बोअरचा खासगी वापर सुरू असल्याची बाब या परिसरातील नागरिकांनी महापालिका सभेत प्रशासनाच्या लक्षात आणून दिली होती. त्यानुसार प्रशासनाने कारवाई केली आहे

फौजदारी कारवाई होणार
मनपाने परिसरातील नागरिकांच्या सुविधेसाठी लाखो रुपये खर्च करून बोअर तयार केले. त्याचा सार्वजनिक वापर होण्याऐवजी अनाधिकृतपणे ताबा करून खासगी वापर केला जात होता. त्यामुळे या नागरिकांवर फौजदारी कारवाई केली जाईल, असे मनपा प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

Web Title: Twelve unauthorized bore to public in Akola