esakal | बापरे! चार सायकलींवरून करीत आहेत बारा युवक हजारो किलोमीटर प्रवास 
sakal

बोलून बातमी शोधा

bicycle

अमरावतीच्या राजकमल चौकात शुक्रवारी मध्यरात्रीनंतर बाराच्या सुमारास हे युवक थांबले होत. त्यांनी काहीवेळा विश्रांती घेत जवळ असलेले काही अन्न ग्रहण केले. त्यानंतर सायकलने पुन्हा मध्यवर्ती बसस्थानक मार्गाने निघून गेले.

बापरे! चार सायकलींवरून करीत आहेत बारा युवक हजारो किलोमीटर प्रवास 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अमरावती : पोटाची खळगी भरण्यासाठी मजुरीकरिता तेलंगणा येथे गेलेले 12 मजूर मेळघाट व मध्य प्रदेशात आपल्या गावी पोहोचण्यासाठी सायकलने प्रवास करीत आहेत. शुक्रवारी, 15 मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास ते अमरावतीच्या राजकमल चौकात थांबले होते. 

12 पैकी 9 मजूर धारणी तालुक्‍याच्या हरदा गावातील रहिवासी असून, उर्वरित तिघे लगतच्या मध्य प्रदेश राज्यातील आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे हजारो किलोमीटरचा प्रवास हे बारा युवक केवळ चार सायकलींवरून करीत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली. वरंगल येथून हे युवक मेळघाट व मध्य प्रदेशात जाण्यासाठी 10 मे रोजीच सायकलने निघाले. सोबत त्यांच्या प्रवासी बॅग आणि काही गठडी होते.

अवश्य वाचा-  मोबाईल कुठून आणल्याचे पालकांनी विचारल्याने मुलीने कालवले घरच्यांच्या जेवणात विष

अमरावतीच्या राजकमल चौकात शुक्रवारी मध्यरात्रीनंतर बाराच्या सुमारास हे युवक थांबले होत. त्यांनी काहीवेळा विश्रांती घेत जवळ असलेले काही अन्न ग्रहण केले. त्यानंतर सायकलने पुन्हा मध्यवर्ती बसस्थानक मार्गाने निघून गेल्याची माहिती काही नागरिकांनी पोलिसांना सांगितली. पोलिसांनी कोतवाली, नांदगावपेठसह इतरही ठाण्यांना त्यासंदर्भात माहिती दिली. त्या युवकांना काही मदत देता येईल का, या उद्देशाने त्यांचा शोध घेण्याचाही प्रयत्न केला. परंतु तेलंगणा येथून सायकलने निघालेले युवक नेमके कोणत्या मार्गाने निघून गेले, हे मात्र समजू शकले नाही. 

सायकलने प्रवास करून आपल्या गावी जाण्याची धडपड करणाऱ्या युवकांना मदत व्हावी, या उद्देशाने त्यांचा रात्री शोधही घेतला. परंतु ते पुढे निघून गेले असावे. 
-शशिकांत सातव, पोलिस उपायुक्त, अमरावती.