आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी अकोल्यातील दोन बॉक्सर

सकाळ वृत्तसेवा 
शुक्रवार, 19 जुलै 2019

- अकोल्याच्या क्रीडा प्रबोधिनीचे दोन बॉक्सर हरिवंश तिवारी आणि अनंत चोडपे यांची इंडोनेशियातील आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेकरिता भारतीय संघात निवड झाली आहे. - लाबुआॅन बाजो येथे तेवीसवी प्रेसिडन्स कप आंतरराष्ट्रीय बाॅक्सिंग स्पर्धा वीस ते  एकोणतीस जुलै दरम्यान होत आहे.

-  त्यासाठी हे खेळाडू इंडोनेशियामध्ये दाखल झाले आहे.  

अकोला : अकोल्याच्या क्रीडा प्रबोधिनीचे दोन बॉक्सर हरिवंश तिवारी आणि अनंत चोडपे यांची इंडोनेशियातील आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेकरिता भारतीय संघात निवड झाली आहे. लाबुआॅन बाजो येथे तेवीसवी प्रेसिडन्स कप आंतरराष्ट्रीय बाॅक्सिंग स्पर्धा वीस ते  एकोणतीस जुलै दरम्यान होत असून, त्यासाठी हे खेळाडू इंडोनेशियामध्ये दाखल झाले आहे.  

अकोल्याच्या क्रीडा विश्‍वासाठी आजचा दिवस अभिमानास्पद असून, हा दिवस क्रीडा इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंदविला जाईल. गत अनेक वर्षांपासून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध स्पर्धांमध्ये अकोल्याचे खेळाडू यशस्वी कामगिरी करीत आहेत. क्रिकेटनंतर आता बॉक्सिंगमध्येही अकोल्याच्या खेळाडूंनी या शहराचे नाव सातासमुद्रापार पोहोचविले आहे.

अकोला क्रीडा प्रबोधिनीचे दोन खेळाडून हरिवंश तिवारी आणि अनंता चोपडे हे वीस ते  एकोणतीस जुलै दरम्यान इंडोनेशियातील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. अकोला क्रीडा प्रबोधिनीचे बॉक्सर यापूर्वी, युवक स्पर्धांमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचले होते. विरिष्ठ संघाकडून प्रथमच अकोल्याचे खेळाडू भारतीय संघाचे प्रतिनिधित्व देशाबाहेर करणार आहेत. हे दोन्ही खेळाडू अकोला क्रीडा प्रबोधिनीचे प्रशिक्षक सतिषचंद्र भट यांच्या मार्गदर्शनात तयार झाले आहेत.

"अकोला क्रीडा प्रबोधिनीचे बॉक्सर राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही पोहोचले आहेत. सर्वांच्याच सहकार्यामुळे आणि शासनाने दिलेल्या पाठबळामुळे आज हे शक्य झाले आहे. अकोल्यातील क्रीडा क्षेत्रासाठी हा अभिमानाचा दिवस आहे. यापुढेही क्रीडा प्रेमी, प्रसार माध्यम आणि शासनाचे असेच सहकार्य मिळत राहील, ही अपेक्षा. हरिवंश तिवारी आणि अनंता चोपडे या दोन्ही खेळाडूंना इंडोनेशियातील स्पर्धत यशस्वी कामगिरीसाठी शुभेच्छा." 
- संतिषचंद्र भट, प्रशिक्षक, अकोला क्रीडा प्रबोधिनी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: two from akola selected for international boxing competition