रेल्वेस्थानकावरून दोन मद्यतस्कर जेरबंद 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 एप्रिल 2018

नागपूर - रेल्वे सुरक्षा दलाच्या विशेष पथकाने मंगळवारी दुपारी नागपूर रेल्वेस्थानकावरून दोन मद्यतस्करांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून चंद्रपूर जिल्ह्यात विक्रीसाठी नेला जाणारा मद्यसाठा हस्तगत करण्यात आला आहे. 

प्रफुल्ल गौतम वैद्य (32) व योगेश पुंडलिक दुरुगकर (36) अशी अटकेतील मद्यतस्करांची नावे असून, दोघेही चंद्रपूर येथील रहिवासी आहेत. मद्यसाठा आणि अमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाने विशेष पथकाचे गठन केले आहे. उपनिरीक्षक राजेश औतकर यांच्या नेतृत्वात उषा तिग्गा, शशिकांत गजभिये, महेश गिरी, सुषमा ढोमणे यांनी मंगळवारी दुपारी तीन वाजता फलाट क्र. 2 वर अचानक धडक दिली. प्रफुल्ल संशयास्पद अवस्थेत वावरताना आढळला. चौकशीत समाधानकारक उत्तरे देऊ न शकल्याने त्याच्याकडील बॅगची झाडाझडती घेतली तसता दारूच्या एकूण 16 बाटल्या आढळल्या. कारवाईच्या सुमारे तासाभरातच फलाट क्रमांक 4 वर छापा टाकण्यात आला. येथे योगेश संशयास्पद अवस्थेत वावरताना दिसला. त्याच्याकडील बॅगची तपासणी केली असता दारूच्या एकूण 16 बाटल्या आढळल्या. पुढील कारवाईसाठी जप्त मद्यसाठ्यासह दोन्ही तस्करांना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ताब्यात दिले आहे. 

Web Title: Two alcoholic drinkers arrest