बोरगाव (सावळी) येथे दहशत माजविणाऱ्या दोघांना अटक

man with knife
man with knife

आंजी मोठी (जि. वर्धा) : निवडणुकीची आचारसंहिता सुरू असताना बोरगाव (सावळी) येथील ग्रामपंचायतीच्या आवारात दोन युवकांनी दुचाकीने येत चाकूच्या धाकावर दहशत माजविण्याचा प्रकार केला. याची माहिती गावकऱ्यांनी आंजी पोलिस चौकीतील पोलिसाना देताच या दोघांना अटक करण्यात आली. ही घटना गुरुवारी (ता. 17) सायंकाळच्या सुमारास घडली.
अनिकेत बबन मुन व स्नेहल विजय बावणे अशी अटक केलेल्या युवकांची नावे असल्याची माहिती पोलिसांनी दिली. अटकेची कारवाई करण्यात आली त्यावेळी दोघेही दारूच्या नशेत असल्याचे सांगण्यात आले. या कारवाईत पोलिसांनी धारदार शस्त्र जप्त केले आहे.
अनिकेत आणि स्नेहल दुचाकीने बोरगाव (सावळी) गावात आले. त्यांनी ग्रामपंचायत परिसरात दुचाकी थांबवून एकमेकांना शिवीगाळ करीत होते. काय प्रकार आहे, हे बघण्याकरिता गावकरी परिसरात जमा झाले. ग्रामस्थांनी विचारणा केली असता या दोघांनी त्यांच्याजवळ असलेला चाकू हातात घेत नागरिकांना धमकाविण्याचा प्रकार केला. यामुळे नागरिक सैरावैरा पळू लागले. हे दोघे गावातील रस्त्याने धावत असताना नागरिकांना ठार मारण्याची भाषा बोलत होते. यामुळे गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.
गावकऱ्यांनी याची माहिती लगेच आंजी (मोठी) पोलिस चौकीला दिली. दरम्यान गावकऱ्यांनी घेराव करून या दोघांना रोखून धरले. घटनेची माहिती मिळताच खरांगण्याचे ठाणेदार संजय गायकवाड, पोलिस उपनिरीक्षक हुसेन शाहा याच्या मार्गदर्शनात जमादार संतोष कामडी, गणेश गायकी, गिरीश चंदनखेडे, किशोर बमनोटे याच्यासह पोलिस कर्मचारी गावात दाखल झाले. नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी दोन्ही युवकांना शस्त्रासह ताब्यात घेत आंजी पोलिस चौकी आणले. दोघांजवळून धारदार जप्त करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com