घरांच्या जाळपोळप्रकरणी दोघे अटकेत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019

अमरावती : पेट्रोल टाकून घरांच्या जाळपोळप्रकरणी गुन्हेशाखेने दोघांना बुधवारी (ता. नऊ) रात्रीच अटक केली. त्यात एक अद्यापही पसार आहे. निशांत दिलीप इंगळे (वय 21), शिवा शेषराव सरदार (वय 20) दोघेही रा. महाजनपुरा) अशी अटकेतील दोघांची नावे असून, त्यांचा साथीदार मयूर भगत (वय 21) हा फरार आहे. 

विजया दशमीच्या दिवशी नीलेश रामदास हिरुळकर (वय 28 रा. आमलेवाडी, महाजनपुरा) हा फळविक्रेता घरासमोर उभा असताना, निशांत, शिवा व मयूर या तिघांनी दारू पिण्यासाठी पैसे मागितले. नीलेशने पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे तिघांनी त्याला धक्काबुक्की केली. नीलेशचा मुलगा रुद्र याला मारहाण केली. शिवाय पोलिसांकडे तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. तिघांनी त्यानंतर नीलेशच्या घरात घुसून दैनंदिन वापराच्या सामग्रीची फेकफाक केली. शिवाय चाकूचा धाक दाखवून घरातील 70 हजार रुपयांची रोकड जबरीने हिसकावली. नीलेशवर चाकूने हल्ला करून त्याचा खून करण्याचा प्रयत्न झाला. एका प्लॅस्टिक कॅनमध्ये त्या तिघांनी पेट्रोल आणले होते. पेट्रोल घरात शिंपून नीलेशच्या घराला आग लावली. त्या तिघांनी नंतर नीलेशच्या भावाचे घरसुद्धा अशाच पद्धतीने पेटविले. दोघा भावांच्या घराला आग लावल्याने या घटनेत जवळपास दीड लाख रुपयांचे नुकसान झाले. जखमी हिरुळकर यांच्या तक्रारीवरून खोलापुरीगेट पोलिसांनी बुधवारी (ता. नऊ) रात्री गुन्हा दाखल केला. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two arrested in connection with the burning of houses