सापाच्या विषाची तस्करी करताना दोघांना अटक 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 मार्च 2017

डिगडोह (हिंगणा) - नागपूर शहर गेल्या काही वर्षांपासून सापाच्या विषाची तस्करी करणारे केंद्र म्हणून ओळख प्राप्त करीत आहे. सोमवारी रात्री हिंगणा एमआयडीसी पोलिसांनी विषारी सापाच्या विषाची तस्करी करणाऱ्या दोन तरुणांना गजाआड करून त्यांना वनविभागाच्या ताब्यात दिले. इनोवा गाडीने आरोपी सापाच्या विषाची तस्करी करीत होते. 

एमआयडीसी पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून गोपाल सिंग रेन सिंग गौर (वय 33) वर्ष हा काही सहकाऱ्यांना सोबत घेऊन विषारी सापांच्या विषाची तस्करी करीत होता. सोमवारी तो नागपुरातील हिंगणा नाका येथील नोगा कंपनी मार्गाने सापाचे विष घेऊन जाणार असल्याचे पोलिसांना कळले. त्या आधारे एमआयडीसी पोलिसांनी सापळा रचून आरोपी गोपालसिंग रेनसिंग गौर व आरोपी रोशन गिरधर अमृतवार (वय 19) याला इनोवा गाडीसह ताब्यात घेतले. त्यांच्याकडून पाच काचेच्या टेस्ट ट्यूबसारख्या बॉटलमधून सापाचे विष जप्त केले. मंगळवारी सकाळी पोलिसांनी दोन्ही आरोपींना हिंगणा वनपरिक्षेत्राचे आरएफओ पाटील यांच्या ताब्यात दिले. पुढील तपास आरएफओ पाटील करीत आहेत. 

Web Title: Two arrested in deadly smuggling of Dragons