आयपीएलवर सट्टा खेळविणाऱ्या दोघांना अटक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 मे 2017

दोघे आयपीएल 20-20 क्रिकेट मॅचवर सट्टा खेळवित असल्याची माहिती विशेष पथक व स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचला. या वेळी दोघेही सट्टा खेळविताना आढळले

गोंदिया -  आयपीएल 20-20 क्रिकेट मॅचवर सट्टा खेळविणाऱ्या दोन जणांना पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाने पकडले. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक केली. ही कारवाई 9 मे रोजी येथील राजेंद्र वॉर्ड माताटोली येथे करण्यात आली. मनोज सुरेशकुमार दरडई (वय 32, रा. माताटोली), अजय अशोक लौंगाणी (वय 25, रा. फुलचूर नाका, गोंदिया) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

राजेंद्र वॉर्ड, माताटोली येथील भाड्याच्या घरात मनोज दरडाई व अजय लौंगाणी हे दोघे आयपीएल 20-20 क्रिकेट मॅचवर सट्टा खेळवित असल्याची माहिती विशेष पथक व स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचला. या वेळी दोघेही सट्टा खेळविताना आढळले. त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याजवळील 19 हजार 310 रुपयांचा माल जप्त केला. ही कारवाई किशोर पर्वते, रमेश गर्जे, चंद्रकांत करपे, श्‍यामकुंवर डोंगरे, दुर्योधन हनवते, राकेश डोंगरवार, लखनलाल काटेंगा, लिलेंद्र बैस, शैलेश अंबुले, नितीन जाधव, तुळशीदास लुटे, जयेश शहारे यांनी केली.

Web Title: two arrested in gondia